विद्यार्थ्यांची आधार पडताळणी,शालेय पोषण आहारासाठी ‘आधार कार्ड’ राहणार अनिवार्य

43

शासनाच्या विविध विभागांकडून राबविण्यात येणाऱ्या सवलती आणि वैयक्तिक लाभाच्यासर्व योजना आधार कार्डशी संलग्न
करण्यासाठी आधार नोंदणीकृत विद्यार्थ्याचे आधार संलग्नकरण्यासाठी राबविण्यात येत आहे.
लाभार्थीना आधारशीसंलग्न करण्याची मोहीम सुरूकरण्यात आली असून, राज्यसरकारच्या विविध विभागांकडूनराबविण्यात येणाऱ्या सवलती आणिवैयक्तिक लाभाच्या सर्व योजना यापुढेआधार कार्ड संलग्न होणार आहेत. याविविध योजनांमधील लाभार्थीसोबीसुविधांपासून वंचित राहू नयेत आणि या योजनेचा पारदर्शी पद्धतीनेराबविण्यात याव्यात, यासाठी हानिर्णय घेण्यात आला आहे. वैयक्‍तिकलाभाच्या योजनांच्या सर्व लाभार्थीचा डेटाबेस तयार करून ते आधार संलग्नकरावे लागणार आहे.

वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार वैयक्तिक लाभाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना दिल्या आहेत. त्यामध्ये पोषण आहार योजनेशी संबंधित सर्व लाभार्थ्यांची नावे आधार कार्डशी जोडण्याची प्रक्रिया डिसेंबर २०२२ अखेरपर्यंत पूर्ण करणे अनिवार्य राहणार आहे. त्यानुसार पोषण आहार योजनेशी संबंधित सर्व लाभार्थी आधार कार्डशी जोडूनच १ जानेवारी २०२३ पासून संबंधित योजनांचा लाभ देण्यात यावा, असे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार शालेय पोषण आहार योजनेस पात्र सर्व शाळांमधील सर्व पात्र लाभार्थ्यांची आधार नोंदणी पूर्ण झालेली असणे आवश्यक असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयानेही स्पष्ट केले आहे

ज्या विभागामध्ये पोषण आहार व त्यासंबंधीच्या धान्याचा पुरवठा होत असतो, त्या वाहनांसाठी जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम
या वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण करणेअनिवार्य आहे. १ जानेवारी २०२३पासून पोषण आहाराशी संबंधित सर्व
लाभार्थी आधार कार्डशी जोडूनचयोजनेचा निधी वितरित करता येणारआहे.

शिष्यवृत्तीसाठी पात्र कोणताहीविद्यार्थी लाभापासून वंचित राहू नये,शिष्यवृत्तीशी संबंधित सर्व योजनाआधार संलग्न करून १ जानेवारी २०२३पासून डीबीटीमार्फत शिष्यवृत्ती विद्यार्थ्याच्या खात्यात जमा करावी लागणार आहे.

शिक्षण संचालनालयाने दिलेल्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेचा लाभ मिळावा, त्यासाठी आता शिक्षकांनीच कंबर कसल्याचे दिसून येते. अद्याप आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांची आधार कार्ड काढावेत, यासाठी पालकांकडे आग्रह धरला जात आहे. तर विद्यार्थी संख्या अधिक असणाऱ्या शाळांमध्येच आधार कार्ड काढण्याचे शिबिर भरविले जात आहे. दरम्यान, यापूर्वीच काढलेले आधार कार्ड अद्ययावत करताना मात्र शिक्षकांना छायाचित्र, बोटांचे ठसे न जुळणे, अशा असंख्य बाबींचा सामना करावा लागत आहे.तसेच अद्यापही काही लाभार्थ्यांची आधार नोंदणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांची आधार नोंदणी करून घेण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाचे नियोजन करावे. त्याचप्रमाणे दर महिन्याच्या २८ तारखेपर्यंत या विद्यार्थ्यांची माहिती सादर करावी, अशी सूचनाही प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून संबंधित सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या आदेशानुसार केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांकडून विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढून ते संलग्न करण्यात येत आहेत.