प्रशांत गटलेवार ठरले जिल्ह्यातील पहीले मतदार जोडणी केंद्रस्तरीय अधिकारी

79

कार्यक्रमाला तालुकास्तरीय मतदान अधिकारी आणि महसुल कर्मचारी मोठया संख्येनी उपस्थित होते.

मतदार यादी प्रमाणीकरण करण्यासाठी मतदार ओडखपत्रासोबत आधार क्रमांक जोडण्याचा राष्ट्रीय कार्यक्रमातंर्गत शंभर टक्के मतदार जोडणीचे काम पुर्ण करून जिल्हयात प्रथम क्रमांकाचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ठरलेले तालुक्यातील कोसंबी येथील मुख्याध्यापक प्रशांत गटलेवार यांचा नुकताच सन्मान करण्यांत आला.
स्थानिक उपविभागीय कार्यालयाचे सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमात तहसिलदार डाॅ. रविंद्र होळी यांचे हस्ते मुख्याध्यापक प्रशांत गटलेवार यांना शासनाचे वतीने प्रशस्तीपत्र देण्यांत आले. यावेळी उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांचेसह उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डाॅ. उज्वल इंदोरकर, नगर परिषद मुख्याधिकारी मनिषा वझाडे, नायब तहसिलदार ओंकार ठाकरे, नंदकिशोर कुमरे आदि उपस्थित होते. भारत निवडणुक आयोगाने १ आँगस्ट २०२२ पासून मतदार यादी प्रमाणीकरण करण्याचे काम संपुर्ण जिल्हयात युध्दपातळीवर सुरू असून नियुक्त करण्यांत आलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे मार्फतीने अँपच्या माध्यमातून नमुना ६ ब मतदारांकडून भरून घेण्यांत येत आहे. या अंतर्गत जिल्हयात बल्लारपूर विधानसभा मतदार संघाने जिल्हयात आघाडी घेतली असून तालुक्यातील कोसंबी मतदान केंद्राचे केंद्रस्तरीय मतदान अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत असलेले जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत गटलेवार यांनी यादीत समाविष्ठ असलेल्या ६७४ मतदारांचे आधार मतदार जोडणीचे काम यशस्वीरित्या पुर्ण केले असून जिल्हयात पहिले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी होण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. त्यानिमित्य शासनाच्या स्थानिक महसुल विभागाच्या वतीने प्रशांत गटलेवार यांचा सन्मान करतांना उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी गटलेवार यांच्या कार्याचे कौतुक केले. मतदान सहायता अँप वरून मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांना घरी बसल्या बसून मतदार जोडणीचे काम करता येते. असे सांगतांना या संधीचा मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांनी लाभ घ्यावा. असे आवाहन खेडकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नायब तहसिलदार यशवंत पवार यांनी केले. नायब तहसिलदार पृथ्वीराज साधनकर यांनी संचालन आणि अमोल करपे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला तालुकास्तरीय मतदान अधिकारी आणि महसुल कर्मचारी मोठया संख्येनी उपस्थित होते.