मुल पोलीस स्टेशन मध्ये शांतता समिती ची सभा संपन्न             

41

     मुल पोलीस स्टेशन यांच्या वतीने येणारे आगामी सण व उत्सव या निमित्त शांतता समिती ची सभा 18/08/22ला पोलीस स्टेशन मूल च्या प्रांगणात घेण्यात आली.
मूल तालुक्याचे तहसीलदार डॉ.रवींद्र होळी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा घेण्यात आली. यात मूल नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ.रत्नमाला भोयर, नायब तहसीलदार यशवंत पवार यांनी गणेश मंडळांना मार्गदर्शन केले. मूल येथील पोलिस निरीक्षक,  सतीशसिंह राजपुत  हे मुख्य आयोजक व मार्गदर्शक होते . त्यांनी कायद्याच्या चाकोरीत राहून अत्यंत आनंदाने व उत्साहाने हा गणेशोत्सव, आणि येणारे इतर उत्सव, सन,साजरे करावे परंतु आपल्याकडून हे उत्सव साजरे करताना कोणताही गालबोट लागणार नाही, याची खबरदारी घ्यावी. गेली दोन वर्ष कोरोनाच्या संकटामुळे आपण हे उत्सव साजरे करू शकले नाही ,याची जाणीव आम्हाला असून ,आपल्या सर्वांच्या भावनांचा आम्ही आदर करतो मात्र आपणही प्रशासनास मदत करावी, सध्या सायबरचे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत आहेत यात आपण चौकस असाव. कोणत्याही धर्माच्या भावना दुखावल्या जातील अस वर्तन करू नये, विशेष ध्वनी प्रसरणाच्या बाबतीत, आपल्यामुळे वाहतुकीला त्रास होणार नाही. आणि कायद्याचे काटेकोर पने पालन करून उत्सव साजरे करण्याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
डॉ.रवींद्र होळी यांनीही यावेळी शासनाच्या एक खिडकी योजना, आणि मंडळाच्या वर्तनाच्या बाबतीत, तर देखावे करताना समाज उपयोगी असावे, ज्यामधून समाजाला, युवापिढीला काही मार्गदर्शक ठरेल असे उदबोधनात्मक असावे. असे सभेला संबोधित केले. सौ.रत्नमाला भोयर , ना.त. यशवंत पवार यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी काही मंडळाच्या वतीने आलेल्या प्रश्नाची उत्तरे ही देण्यात अली. उत्सव साजरा करताना प्रत्येक नागरिक कायद्याच्या सर्व नियमावली समजून घेणारा नसतो यावर अधिकाऱ्यांनीही समजून घेणे गरजेचे असल्याचे, त्यावर कायद्याची जाक्ती करू नये असे उपस्थित मंडळाकडून बोलण्यात आले.

सदर सभेला मूल नगर परिषदेचे आरोग्य अधिकारी अभय चेपुरवार , माजी नगर उपाध्यक्ष नंदू रणदिवे, डॉ.राममोहन बोकारे, मोतीलाल टहेलियानी,प्रशांत समर्थ, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, पत्रकार, गणेश मंडळाचे पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, सभासद , माजी नगरसेवक,. महिला भगिनी सर्व ध्वनी प्रेक्षपाचे मालक, उपस्थित होते.