करवन येथील वाघाने हल्ला केलेला जखमी गुराख्याचा अखेर मृत्यू

35

मुल – गावापासून अंदाजे सहा सात किलोमीटर अंतर असलेल्या आणि नेहमीच वाघाचा वावर असलेल्या घनदाट जंगलामध्ये तीन गुराखी गुरे चारण्याकरिता गेले असता काल पट्टेदार वाघाने भाऊराव गेडाम या ५५ वर्षीय गुराख्यावर हल्ला केला त्याच्यासोबत असलेल्या दोन सहकाऱ्यांनी आरडाओरोड केल्यामुळे वाघाने तिथून पळ काढला . यात जखमी झालेला भाऊराव गेडाम वय 55 वर्षे याला पाठीला पायाला खोलवर जखमा झाल्याने मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात सकाळी ७-०० वाजता उपचारसाठी भरती करण्यात आले. नंतर ११-४५ ,वाजता पुढील उपचाराकरिता त्याला चंद्रपूर येथे जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. जखमा खोलवर झाल्या असल्याने त्यावर उपाय शक्य झालं नाही आणि भाऊरावने आज १८/८/२०२2 रोजी भाऊराव गेडाम याचा अखेर मृत्यू झाला. त्यामुळे करवन गावं परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. जंगला लगत गावातील शेतकरी,शेमजुर, गुरे चारणारे गुराखी इतर नागरिकांना देखील घटनेच्या आदल्या दिवशीच वाघाचा वावर असलेल्या जंगलात खूप खोलवर जाऊ नये असे वन अधिकारी यांनी तोंडी सांगून तसे पत्रही दिले होते. तरी सुद्धा सध्या जंगलात रानभाज्या, काटवल, बांबूचे वास्ते, जंगली भाज्या मिळतात या हेतूने गुराखी जंगलाच्या आजूबाजूला गुरे न चारता जंगलाच्या आत रानभाज्या मिळतात म्हणून गेल्याने अखेर गुरख्याला आपला जीव गमवण्याची वेळ आली. याबाबतची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी यांना प्राप्त होतच तात्काळ वनविभागाकडून ५० ,हजार रुपयाची मदत नातेवाईकांना रोख देण्यात आली आहे .वनविभागाने स्वमर्जीने वाघाचा वावर असलेल्या जंगलात शक्यतोवर जाणे टाळावे असे सांगितल्यावरही जंगलात खोलवर जात असतील तर मात्र वनविभाग नेहमीच जबाबदार कसे राहणार असे वन विभागाचे म्हणणे आहे. गावामध्ये वाघाची अजूनही दहशत कायम आहे हे गाव बफर झोन मध्ये येत असल्याने तिथे वन अधिकाऱ्यांनी गावांमध्ये जाऊन नेहमीच सूचना करतात तरी देखील गुराखी जंगलात खोलवर जाणे बंद करावे. कोणीही जास्त आत जंगलात लांबपर्यंत जाऊ नये जंगल पावसामुळे घनदाट झालेला आहे १० फूट लांबीच्या अंतरावर जवळपास असलेले हिंसक प्राणी नजरेत दिसून येत नाही, यासाठी गुराखी व नागरिक आपले जीव धोक्यात टाकू नये गावं शेजारीच चाराई करावी. अशा पद्धतीचे पत्र गावात गुराख्यांना. दिले तरी देखील जंगलात जाणे सुरूच राहते. म्हणून घटना घडत असतात. या दोन महिन्याच्या कालावधीतील वाघाच्या हल्यात दगावलेल्या व्यक्तीची ही चौथी घटना असल्याचे समजते. सदर घटनेकडे वन विभागाने गांभीर्याने लक्ष घालून त्यावर उपाय करावा अशी येथील जनतेची मागणी आहे.