स्त्रीरोग तज्ञ डॉ. सोनल टहलीयानी मूल उपजिल्हा रुग्णालयात रुजू

31

मूल : राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा स्थानिक प्रतिष्ठीत व्यावसायीक स्व. लक्ष्मणदास टहलीयानी यांची नात, बाजार समितीचे माजी सभापती तथा माजी नगरसेवक मोतीलाल टहलीयानी यांची पुतणी आणि महेश टहलियानी यांची कन्या डाँ. सोनल टहलीयानी येथील उपजिल्हा रूग्णालयात स्ञी रोग तज्ञ म्हणुन अलीकडेच रूजु झाल्या आहेत. डाँ. सोनल ह्या येथील सेंट अँन्स हायस्कुलच्या विद्यार्थी आहे. एलएडी काँलेज नागपूर येथे इयत्ता १२ वी विज्ञानचे शिक्षण पुर्ण केले. दिल्ली येथील डाँम्स इन्स्टीट्युट मधुन नीट अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथुन एमबीबीएस चे शिक्षण पुर्ण केले. एमबीबीएस शिक्षणाचे काळात डाँ. सोनल टहलीयानी यांनी विद्यापीठात तीसरी रँक मिळवित ब्राँझ मेडालची विजेता ठरली. पाँडीचरी येथील विनायक मिशन वैद्यकीय महाविद्यालय येथुन डाँ.सोनल यांनी प्रसुती व स्ञीरोग तज्ञचे अभ्याक्रम पुर्ण केले. स्थानिक उप जिल्हा रूग्णालयात वैद्यकीय अधिका-यांची वाणवा असुन स्ञीरोग तज्ञाची अत्यंत निकड होती. डाँ. सोनल यांच्या रूपाने स्थानिक उपजिल्हा रूग्णालयात स्ञीरोग तज्ञाची कमतरता दुर झाली आहे. येथील उपजिल्हा रूग्णालयात रूजु होण्यापुर्वी डाँ. सोनल टहलीयानी यांना नागपूर येथील काही नामांकित वैद्यकीय संस्थेत बोलावणे आले होते परंतु आपल्या शिक्षण आणि अनुभवाचा लाभ त्यांनी आपल्या तालुक्यातीला जनतेला देण्यात धन्यता माणुन येथील उपजिल्हा रूग्णालयात कालच त्या रूजु झाल्या. त्यांच्या या कार्याबद्दल शहरातील नागरीकांनी डाँ. सोनल टहलीयानी यांचे अभिनंदन केले आहे.