आजच्या डिजिटल वैज्ञानिक युगातही रक्षाबंधनचे महत्व तीरभरही कमी झालेले नाही बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतीक रक्षाबंधन

51

जगाच्या पाठीवर भारतीयसंस्कृतीच्या संस्कारांना आजहीतोड नाही. आपली संस्कृती मौलिकआहे. जीवन जगण्याला गोडीनिर्माण करण्याची ताकद भारतीयसमाज मनात रुजली आहे. प्रत्येकनात्याच्या वळणावर नैतिकतेचेमापदंड असून, बहीण भावाच्यानात्यालाही शिरपेचा सन्मान आहे.रक्षाबंधन अर्थात नारळी पौर्णिमाउत्साहात पार पडत आहे.पावसाच्या अडचणीतही बहिणीचीभावाच्या घरी रक्षाबंधनासाठी हजेरी ठरलीच आहे.आरतीय संस्कृती उत्सव प्रियआहे. श्रावण महिन्यात नागपंचमीनंतर येणारा महत्त्वाचा सण म्हणजेरक्षाबंधन. श्रावण पौर्णिमेच्या पर्वातया सणाला विशेष महत्त्व आहे.बहिण भावाच्या अतूट नात्याचाआलेख म्हणजेच रक्षाबंधन,आजच्या डिजिटल वैज्ञानिकयुगातही रक्षाबंधनचे महत्व तीरभरही कमी झालेले नाही. तरुण-तरुणीकॉलेज जीवनात मोठ्या आदरानेरक्षाबंधनाचा सण निभावून भाऊ-बहिणीचे नाते घट्ट करीत आहेत.जातीपातीच्या मर्यादा ओलांडूनरक्षाबंधन पार पाडला जातो.रक्ताच्या नात्यापेक्षाही मानलेलीनाती मोठी ठरतात. ही नाते.टिकविण्याची किमया भारतीयसंस्कृतीच्या रक्षाबंधन उत्सवातआजही कायम आहे. कितीहीअडचणी व संकटे असली तरीबहीण भावाच्या किंवा भाऊबहिणीच्या घरी रक्षाबंधनालानक्की जातात. रक्षाबंधनाच्या अतूटधाग्याने बहीण भावाचे नाते.चिरकाल टिकते. भाऊ बहिणीच्यारक्षणाकरता तत्पर असतो.रक्षाबंधनाचे रूप बदलू शकते मात्रभाव कायम असते. लहान मोठ्यांचाभाव न ठेवणारा केवळ प्रेम म्हणजेप्रेम याच नात्याने रक्षाबंधन निभावले जात आहे.