नगर परिषद मूल कार्यालयात श्री.महादेव खेडकर प्रशासक नगर परिषद मूल यांच्या हस्ते तिरंगा विक्री केंद्राचे उद्घाटन

31

नगर परिषद मुल
स्वातंत्राचा अमृत महोत्सव अंतर्गत “घरोघरी तिरंगा”उपक्रमबाबत नागरिकांकरिता व आस्थापना धारकांकरिता नगर परिषद मूल कार्यालयात श्री.महादेव खेडकर प्रशासक नगर परिषद मूल उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते तिरंगा विक्री केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

हर घर तिरंगा उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्याबाबत तहसीलदार यांनी मार्गदर्शन केले. तसेच राष्ट्रध्वज प्रत्येक घरांमध्ये व्यवस्थित हाताळावेत व कुठेही राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही.त्या प्रसंगी तहसीलदार डाॅ.रविंद्र होळी ,नायब तहसिलदारश्री.यशवंत पवार,नायब तहसिलदारश्री.कुंभारे,श्री.ठाकरे नायब तहसिलदार व नगर परिषद मूल कार्यालयातील श्री.श्रीकांत समर्थ,श्री.अभय चेपूरवार,श्री.आलेख बारापात्रे व इतर सर्व नगर परिषद मूल कर्मचारी वर्ग उपस्थित होते.तिरंग्याची किंमत ही २५ रुपये ठेवण्यात आलेली आहे.नगर परिषदे तर्फे शहरातील सर्व नागरिकांना आवाहन आहे की सर्वांनी “घरोघरी तिरंगा” उपक्रमात सहभाग घ्यावा…