मूल येथे राष्ट्रध्वज विक्री केंद्राचे उद्घाटन गट विकास अधिकारी देव गुनावत यांच्या हस्ते

36

.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शासनाच्या सुचनेप्रमाणे 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत नागरिकांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकाविणे अपेक्षित आहे. बचत गटाच्या माध्यमातून गावोगावी नागरिकांना राष्ट्रध्वज उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंचायत समिती, मूल येथे राष्ट्रध्वज विक्री केंद्राचे उद्घाटन गट विकास अधिकारी देव गुनावत यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्ह्यातील हर घर तिरंगा उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रध्वज प्रत्येक घरांमध्ये व्यवस्थित वेळेत पोहचविण्याकरीता नियोजन करण्याबाबत गट विकास अधिकारी डॉ. देव घुनावत यांनी सूचना केल्यात.

याप्रसंगी तालुका अभियान व्यवस्थापक नितीन वाघमारे, तालुका व्यवस्थापक निलेश जीवनकर, प्रशासन तथा लेखा सहाय्यक वसीम काझी, तालुका समन्वयक जयश्री कामडी, स्नेहल मडावी, प्रभाग समन्वयक अमर रंगारी, संगीता शिंदे, सिद्धार्थ वाळके, रुपेश आदे, deo मयूर भोपे तसेच समूहातील महिला उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या जिल्हा व्यवस्थापन कक्ष व पंचायत समिती व्यवस्थापन कक्ष यांच्या समन्वयातून प्रत्येक कुटुंबापर्यंत राष्ट्रध्वज पोहोचविण्याकरीता उमेद अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यामध्ये पंचायत समिती स्तरावर राष्ट्रध्वज विक्री केंद्र उघडण्यात येत आहेत.