मुल न.प.चे विविध कार्यक्रम :आजादी का अमृत महोत्सव ,घरोघरी तिरंगा हा उपक्रम नगर परिषद मूलचे वतीने

73
भारतीय स्वातंत्राला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात स्वातंत्र लढयाच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र संग्रामातील अज्ञात नायक/क्रांतीकारक स्वातंत्र संग्रामात घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे, तसेच स्वातंत्रासाठी चेतवलेले स्फुल्लींग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल भावना कायमस्वरुपी जनमाणसात राहावी या उददेशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी दिनांक १३ ऑगस्ट २०२२ ते दिनांक १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे घरोघरी तिरंगा हा उपक्रम नगर परिषद मूलचे वतीने राबविण्यात येत आहे.
दिनांक १३ ऑगस्ट २०२२ ते दिनांक १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत नगर परिषद मूल क्षेत्रातील प्रत्येक नागरीकांच्या घरावर, तसेच सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करावयाची आहे. तसेच घरोघरी कार्यक्रमात दिनांक १३ ऑगस्ट २०२२ ते दिनांक १५ ऑगस्ट २०२२ हे तीन दिवस घरोघरी तिरंगा फडकवतांना दररोज संध्याकाळी झेंडा उतरावयाची आवश्यकता नाही. परंतू कार्यालयाला यासंबंधी ध्वज संहिता पाळावी लागेल तसेच हर घर झेंडा उपक्रमांतर्गत लावण्यात आलेले झेंडे अभियाना कालावधीनंतर प्रत्येकांनी सन्मानाने व सूरक्षित ठेवावे. झेंडा फेकला जावू नये तो सन्मानाने जतन करुन ठेवावा. तसेच अर्धा झुकलेला, फाटलेला कापलेला झेंडा कूठलेही परिस्थितीत लावला जावू नये. मूल शहरात खादी अथवा कॉटन, पोलीस्टर, सिल्क कापड यापासून बनविल्या गेलेला तिरंगा विकी करीता दूकानात तसेच नगर परिषदेच्या स्टॉलवर विक्री करीता उपलब्ध करण्यात येणार आहे.
आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत नगर परिषद मूल कार्यालयाचे वतीने दिनांक ८ ऑगस्ट २०२२ ते दिनांक १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे जसे शालेय विदयाथांकरीता चित्रकला व निबंध स्पर्धा, प्रदूशन मूक्त सायकल रॅली जनजागृती हर घर तिरंगा, स्वच्छता अभियान, महिला मेळावा, अंगणवाडी बालकांसाठी गोपाल पंगत, पर्यावरण संवर्धन शपथ वृक्षारोपन कार्यक्रम, रांगोळी स्पर्धा तसेच माजी सैनिक सत्कार व बक्षिस समारंभ आयोजन करण्यात आलेले आहे.