कारगिल विजय दिवसानिमित्त शहिदांना मूल येथे आदरांजली

51

कारगिल विजय दिवसानिमित्त शहिदांना आदरांजली वाहण्यात येतेय. ऊन्ह, थंडी आणि पावसाची तमा न बाळगता देशाच्यासिमेवरसतर्क पहारा देणाऱ्या सैनिकांमूळे आज देशातील नागरीक सुरक्षित जीवन जगत आहे. स्वतःच्या कुटूंबाची तमा न बाळगतादेशवासीयांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. असे मत तहसिलदार डाँ. रविंद्र होळी यांनी व्यक्त केले.तालुका माजी सैनिक संघटना आणि भरारी माजी सैनिक महीला बचत गट यांचे संयुक्त विद्यमाने स्थानिक आदीवासी मूलांचे वसतीगृह परीसरात संपन्न झालेल्या कारगिल युध्दात सहभागी झालेल्या शहीदांचे स्मरण आणि विजय दिन कार्यक्रमात ते बोलत होते. माजी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी कारगील युध्दात प्रत्यक्ष सहभागी झालेले अनिल यत्ते, माजी सैनिक कल्याण बहुउद्देशिय संस्थेचे हरीश गाडे,पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश बोबाटे, श्री साई मिञ परिवारचे अध्यक्ष विवेक मुत्यलवार, शिवशाही मिञ परीवारचे अध्यक्ष किसन शेरकी, छायाचिञकार संघटने अध्यक्ष रूपेश कोठारे, ज्येष्ठ माजी सैनिक मारोती कुळमेथे, वसतीगृहाचे अधिकारी गजेंद्र प्रधान, माजी सैनिक महीला बचत गटाच्या अध्यक्षा अंजली सुर, उपाध्यक्ष पुष्पा जंबुलवार   आदी उपस्थित होते.प्रारंभी मान्यवरांनी हुतात्मा प्रतिमेला अभिवादन केले. सामुहीक श्रध्दांजली नंतर संघटनेचे तालुकाध्यक्ष एकनाथ गडेकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कारगील युध्दात प्रत्यक्ष सहभागी असलेले अनिल यत्ते यांनी भारतीय सैन्यानी उत्तुंग पराक्रम करीत कारगीलमध्ये कसा विजय संपादन केला, याबाबत अनुभव कथन केले. यावेळी आयोजक संघटनांच्या वतीने अनिल यत्ते यांचेसह काही माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर यांनी देशाच्या सुरक्षिततेसाठी कार्य करणाऱ्या सैनिकाप्रमाणे नागरीकांनी शहराच्या सुरक्षिततेसोबत शहर स्वच्छतेसाठी सजग राहावे. असे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचलन सहदेव रामटेके यांनी तर आभार प्रदर्शन बाबा सुर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मारोती कोकाटे, लक्ष्मण निकुरे, प्रकाश झरकर, प्रशांत पाटील, प्रकाश महाडोळे, अशोक सातपुते, करूणा खोब्रागडे, कविता गडेकर, सुनिता खोब्रागडे, उज्वला रंगारी, पंचशीला खोब्रागडे, कविता मोहुर्ले, नलीनी मेश्राम आदिनी परीश्रम घेतले.