पीक विमा काढण्याची अंतिम मुदत ३१ जुलै रविवार हा शासकीय सुट्टीचा वार असल्यामुळे,अंतिम दिनांक ०१ ऑगस्ट २०२२

30

45   शेतक-यांनी उतरविला पिकविमा प्रगती काॅम्यूटर आपले सरकार सेवा केंन्द्रात

यंदा पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आजच ‘पिकांचे अतोनात नुकसान आहे. अशा
स्थितीत शेतकऱ्यांना पीक विम्याच्यामाध्यमातून आपल्या नुकसानीची  तीव्रता कमी करता येणार आहे. पीक
‘विमा काढण्यासाठी रविवार ३१ जुलै  हा अखेरचा दिवस  रोजी रविवार हा शासकीय सुट्टीचा वार असल्यामुळे,
केंद्र शासनाने मार्गदर्शन सूचनेत व वरील पत्रात नमूद केल्यानुसार आता विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक ०१ ऑगस्ट २०२२ असा असणार आहे.

खरिपात भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, भुईमूग, सोयाबीन, कारळा, मूग, उडीद, तूर, कापूस व कांदा या पिकांसाठी विमा संरक्षण प्राप्त झाले आहे. त्यासाठी मुंबईच्या एचडीएफसी इर्गो इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.

कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ही योजना ऐच्छिक करण्यात आली आहे. मात्र कर्जदार शेतकऱ्यांनी तसे संबंधित बँकेस अथवा पतपुरवठा करणाऱ्या संस्थेस कळविणे बंधनकारक असेल, असे सांगून श्री. सोनवणे म्हणाले, की पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, भूस्खलन, पावसातील खंड, कीड-रोग आदींमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट जोखमीच्या बाबींमध्ये समाविष्ट आहे.

हवामान घटकाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी अथवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांचे काढणी पश्चात होणारे नुकसान, तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी देखील या पीक विम्याचे संरक्षण मिळणार आहे.

शेतकऱ्यांनी पीकविमा भरण्यासाठी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्राशी अथवा बँकेशी संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडल कृषिअधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा.


कृपया याबाबत सर्व संबंधितांनी नोंद घेऊन उचित कार्यवाही करावी, ही विनंती. 🙏
विनयकुमार आवटे ,
ही योजना कर्जदार व बिगर  कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक स्वरूपाची आहे. 
काढता येणार आहे. .

अत्यंत महत्त्वाचे
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप २०२२ हंगामासाठी विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक ३१जुलै २०२२ असा होता.
दिनांक ३१ जुलै २०२२ रोजी रविवार हा शासकीय सुट्टीचा वार असल्यामुळे,
केंद्र शासनाने मार्गदर्शन सूचनेत व वरील पत्रात नमूद केल्यानुसार आता विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक ०१ ऑगस्ट २०२२ असा असणार आहे.
कृपया याबाबत सर्व संबंधितांनी नोंद घेऊन उचित कार्यवाही करावी, ही विनंती. 🙏
विनयकुमार आवटे ,