ओबीसी जनगणना समन्वय समिती, व ओबीसी विविध संघटनेची मुल मंडल यात्रा नियोजन सभा मुल तालुका पत्रकार संघ

63

मुल – ओबीसी जनगणना समन्वय समिती, व ओबीसी विविध संघटनेची मुल मंडल यात्रा नियोजन सभा मुल तालुका पत्रकार संघ येथे दिनांक २९जुळै २०२२ रोजी आयोजित करण्यात आली होती.४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मंडल यात्रा मुल येथे पोहोचणार असून यात्रेचे स्वागत मोठ्या उत्साहाने व्हावे असे बैठकीमध्ये ठरांवेण्यातआले असून यासाठी ओबीसी युवकांनी महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. तसेच मुलनगरातून ओबीसींची महाऱ्याली काढून जनतेमध्ये जनजागृती करण्यात येऊन ओबीसीन्रा जागृत व संघटित करावे असेही ठरविण्यात यावे असेमत बैठकीला उपस्थित ओबीसी प्रमुख कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. बैठकीला मार्गदर्शक म्हणून प्रा. अनिल डहाके, डॉ. समीर कदम, मुख्यसंयोजक डॉ. राकेश गावतुरे, प्राचार्य कऱ्हाडे, प्रा.ताजने, प्रा. वासाडे, प्रा.धोटे, लक्ष्मण खोब्रागडे यांची उपस्थिती होती. यात्रेचे स्वागत रॅलीचेनियोजन व पुढील स्वरूप कसे असावे याबाबत गुरु गुरनुले, संजय पडोळे,जितेंद्र लेनगुरे,लक्ष्मण खोब्रागडे यांनी आपले विचार व्यक्त केले. तरओबीसी आरक्षण, मंडल आयोग, राज्य घटनेनुसार संख्येचे आरक्षण का असावे याबाबत प्रा.अनिल डहाके, डॉ. समीर कदम, डॉ. राकेश गावतुरेयांनी दिशादर्शक माहिती दिली. सभेचे संचालन व आभार मुल संयोजक प्रा विजय लोनबले यांनी केले. आयोजित तातडीच्या सभेला गंगाधरकुंचडकर, सुनील शेरकी, हसन वाढई, देवराव ढवस, मंगर सर,जितेंद्र बलुकी, युवराज चावरे, ईश्‍वर लोनबले,राकेश मोहरले, रामदासगुरनुले,कैलास चलाख, ओमदेव मोहरले, दुद्ांत महाडोळे, अमित राऊत, प्रशांत भरतकर यांचेसह अनेक ओबीसी चळवळीचे संघटककार्यकर्ते उपस्थित होते.