मुल तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचे आरक्षण जाहीर

30
मूल (प्रतिनिधी)
मूल तालुका जिल्हा परिषद  व पंचायत समितीचे सदस्यांचे आरक्षण आज जाहीर करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्यांचे आरक्षण हे चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात तर पंचायत समिती सदस्यांचे आरक्षण हे मूल तहसिल कार्यालयात काढण्यात आले.
आरक्षण जाहीर झाल्यांने आता इच्छुक उमेदवार निवडणूकीच्या तयारीला लागणार आहे.
मूल तालुक्यात चार जिल्हा परिषद सदस्य संख्या असून, त्यात चिखली चिचाळा (अनुसूचित जमाती महिला), सुशी दाबगांव  (सर्वसाधारण महिला) बेंबाळ जुनासुर्ला (नागरीकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण) मारोडा राजोली (अनुसूचित जाती महिला) असे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
पंचायत समिती सदस्य पदासाठी राजोली क्षेत्र (सर्वसाधारण महिला), मारोडा (सर्वसाधारण), चिखली (अनुसूचित जमाती महिला), चिचाळा (सर्वसाधारण महिला) चिरोली (सर्वसाधारण) सुशी दाबगांव (नागरीकांचा मागास प्रवर्ग) जुनासुर्ला (सर्वसाधारण महिला) बेंबाळ (अनुसूचित जाती) असे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.