वॉर्ड क्रमांक10 येथील नागरिकांना  ये- जा करण्याकरिता तारेवरची  कसरत

88

मूल (वा.) येथील वॉर्ड क्रमांक10 येथील आदिवासी लेआऊटमध्ये  रस्ता व नालीचे काम केलेले नाही.त्यामुळे तेथीळ परिसरात सर्वत्र  चिखलाचे साम्राज्य आहे. नागरिकांना  ये- जा करण्याकरिता तारेवरची  कसरत करावी लागत आहे. त्यामुळे
वेळीच उपायोजना करावी, अशी  मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात  आली आहे.

परिसरात जागोजागी पाणी साचून  असल्यामुळे साथीचे रोग सुद्धा पसरत आहेत. याबाबतची दखळ घेऊन
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष  भास्कर खोब्रागडे व महिला शहर  अध्यक्ष अर्चना चावरे यांच्या नेतृत्वात
नगरपरिषद मूळ येथे निवेदन देण्यात आले. याबाबत लवकर कारवाई करू असे आश्वासन नगरपरिषदतर्फे देण्यात
आले.निवेदन देताना नंदू कावडे, शिलासलाम, लक्षी मडावी, साधना मेश्राम,रंजना सिडाम, छाया कटकमवार,
संगीता चीत्रोजवर, बेबी मडावी, शिलापंश्रे, सविता कावडे, पंकज कटकामवर,सुलोचना पोर्ट, प्रतीक्षा गुरूनुळे, जनाबाई
धकाते, पल्लवी गुंडावार, रूपा रोहनकर व इतर नागरिक उपस्थित होते.