बोरचांदली येथील शेतशिवारात विद्युत खांबाला स्पर्श झाल्याने चार जनावरे जागीच ठार

31

मूल: तालुक्‍यातील बोरचांदली येथीलशेतशिवारात उभ्या असलेल्या विद्युतखांबाला करंट असल्याने चराईसाठीगेलेल्या जनावरांचा विद्युत खांबालास्पर्श झाल्याने चार जनावरे जागीचठार झाली. ही घटना गुरवारी सकाळी११वाजता घडली.बोरचांदली येथील जनावरे
जुराख्याने बोरचांदली-मूल मार्गानेनेली. दरम्यान, जवळच असलेल्यागोयल नामक व्यक्तीच्या शेतशिवारातउभ्या असलेल्या विद्युत खांबाला करंटअसल्याने जनावरांना करंट लागूनसदर दुर्घटना घडली. त्यामध्ये संजय कुंटावार व नितीन कुंटावार यांची
प्रत्येकी एक गाय तर महेश’कटकमवार यांचा एक बैल व एक म्हैसआणि विनायक पुपरेड्रीवार यांची एकगाय अशा पाच जनावरांना करंटलागला. मात्र, यापैकी चार जनावरेजागीच ठार झाली तर महेशकटकमवार यांची म्हैस सुदैवाने
बचावली. ऐन शेतीच्या हंगामात घटनाघडल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक   नुकसान झाले आहे.