गोंडवाना विद्यापीठाच्यामानव विज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता पदी डाँ. चंद्रमौली यांची नियुक्ती

45

मूल : गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या मानव विज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता पदी राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली येथील प्राचार्य डाँ. ए. चंद्रमौली यांची विद्यापीठाचे कुलगुरू डाँ. प्रशांत बोकारे यांनी नुकतीच नियुक्ती केली.
विद्यापीठाच्या मानव विज्ञान शाखेच्या अधिष्ठाता पदी नियुक्त झालेले डाँ. ए. चंद्रमौली मागील सोळा वर्षापासुन सावली येथील भारत शिक्षण प्रसारक मंडळ व्दारा संचालित राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली येथे प्राचार्य पदी कार्यरत आहेत. इंग्रजी विषयाचे अनुभवी आणि अभ्यासु असलेले डाँ. चंद्रमौली सावली येथील महाविद्यालयात प्राचार्य पदी रूजु होण्यापुर्वी चामोर्शी येथील कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालयात तेरा वर्षे आणि महीला महाविद्यालय गडचिरोली येथे दोन वर्षे सहाय्यक प्राध्यापक म्हणुन सेवारत होते. सहाय्यक प्राध्यापक आणि प्राचार्य पदाच्या प्रदीर्घ कार्यकाळात डाँ. चंद्रमौली यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी, जिल्हा अध्यक्ष आदी महत्वाचे पद भुषविले आहे. हितवाद वृत्तपञाचे प्रतिनिधी राहीलेले डाँ. चंद्रमौली यांना उत्तम सेवाकार्या बद्दल विविध पुरस्कार मिळाले आहे. प्राचार्य पदाच्या सोळा वर्षाच्या कार्यकाळात डाँ. चंद्रमौली यांनी शिक्षण संस्थेच्या सहकार्याने साधलेली महाविद्यालयाची प्रगती प्रशंसनिय व उल्लेखनीय राहीली आहे. सामाजीक, शैक्षणिक, संशोधन सोबतच प्रशासकीय कार्याचा उत्तम अभ्यास आणि अनुभव असलेले प्राचार्य डाँ. चंद्रमौली यांनी राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध विषयावर शोध निबंध आणि मार्गदर्शन केले आहे. पीएच.डी. चे मार्गदर्शक असलेले डाँ, चंद्रमौली यांचे मार्गदर्शनात अनेक विद्यार्थ्यांनी नागपूर विद्यापीठ आणि गोंडवाना विद्यापीठातषशोध निबंध सादर केले आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या मानव विज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता पदी कुलगुरू डाँ. प्रशांत बोकारे यांनी निवड समितीच्या शिफारसी नुसार नियुक्ती केल्याने विद्यापीठाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यास मोलाचे सहकार्य लाभणार आहे. नियुक्ती बद्दल डाँ. चंद्रमौली यांनी कुलगुरू डाँ. प्रशांत बोकारे. प्र-कुलगुरू डाँ. श्रीराम कावळे, विद्यापीठ निवड समितीचे सर्व सदस्य, संस्थाध्यक्ष संदीप गड्डमवार, सचिव राजाबाळ संगीडवार आणि संस्थेच्या सर्व पदाधिका-यांचे आभार मानले आहे.