पावसामूळे भिंत पडून चार बक-यांचा मृत्यु ,मूल तालुक्यातील चिचाळा येथील घटना

49

मागील काही दिवसांपासुन सुरू असलेल्या संततधार पावसामूळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेत आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन काल राञौ चिचाळा येथे एका घराची भिंत पडून दिलीप बिजाजी गुरनुले यांच्या ४ बक-यांचा जागीच मृत्यु झाल्याने गरीब शेतकऱ्याचे हजारोचे नुकसान झाले आहे.

घटनेची माहीती होताच महसुल प्रशासनाने दखल घेवुन मदतीसाठी वरीष्ठांकडे विनंती केली आहे. तालुक्यात मणुष्यहानी झाली नसली तरी हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आल्याने शेकडो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. शहर आणि तालुक्यातील अनेकांच्या राहत्या घरी पाणी शिरल्याने त्यांचे अन्नधान्य व महागड्या साहीत्याचे नुकसान झाले आहे.

दरम्यान नुकसानग्रस्त अनेक कुटूंबाना आ. सुधीर मुनगंटीवार यांचे वतीने जीवनावश्यक साहीत्य पुरविण्यात आले असुन तालुक्यातील कोणत्याही कुटूंबावार उपासमारीचे संकट कोसळु नये म्हणुन कार्यकर्त्यांना परिस्थितीवर लक्ष ठेवुन सहकार्य करण्याचे निर्देश दिल्याने भाजपा कार्यकर्ते मदतग्रस्तांच्या मदतीसाठी तयार आहेत.