उमा नदी वरील पुलावरुन पाणी चामोर्शी मुल मार्ग बंद,पर्यायी खेडी मार्गे चामोर्शी रोड सुरु ,पुलावर चोख पोलिस बंदोबस्त

27

मूल – मुल वरुन वाहणारी उमा नदी आणि आसोला मेंढा तलाव पूर्ण १०० टक्के भरल्याने तलावातून निघालेला वेस्ट वेअर म्हणजे चीमढा नदीअसा इतिहास आहे.आणि चिमढा नदी ही मुल चामोर्शी मार्गाला जाणाऱ्या मुख्य रस्त्याला वाहणाऱ्या उमा नदीला जाईंड झाल्यामुळे दोन्ही नद्या एकत्र आल्यानेमुल-चामोर्शी नदी पुलावरून पुराचे पानी ओसंडून वाहत असल्याने चामोर्सी मार्ग बंद झाला असल्याने या मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्याबोरचांदली, राजगड, चांदापुर, फिस्कुटी, विरई, गडीसुरला, जूनासुर्ला, बेंबाळ, भवराला नवेगाव भूजला व त्यापलिकडेही गावाची वाहतूकखोळंबली आहे. करीता काही नागरिकांना व शाळेच्या शिक्षकांना देखील आकापुर मार्गाने किंवा भेजगाव मार्गाने जाणे येणे भाग पडलेआहे.चामोर्शी मार्गावर मुल पोलिसांनी आपला बंदोबस्त लावला असून वाहतूक करणाऱ्यांना वाहतूक करण्यास मनाई करीत असल्याचे दिसून येतआहे. असेच रात्री सतत सारखा पाऊस राहिला तर मात्र उमा नदीचा पूर वाढून सभोवतालचे सर्व मार्ग बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसूनयेत आहेत. अशीच वाहतूक बंद राहिली तर मात्र नागरिकांचे तहसील,पंचायत समिती, उपजिल्हा रुग्णालय, मुलची मुख्य बाजार पेठची कामेअसून पडणार हे नक्की.