बैलगाडीने मार्ग काढताना दोघांचे प्राण वाचले,ग्रामस्थांच्या समयसुचकतेने जीवितहानी टळली

57

चंद्रपूर
शेतावर जाण्यासाठी पूर आलेल्या नाल्यातून बैलगाडीने मार्ग काढीत असताना पूराच्या प्रवाहाने बैलजोडीसह शेतकरी वाहून जात असताना नाल्यालगत असलेल्या शेतकर्‍यांनी समयसुचकतेने सदर शेतकर्‍यांसह बैलजोडीला वाचविण्यात यश आले आहे. गहिनीनाथ वराटे असे शेतकर्‍याचे नाव असून त्याच्याच मालकीची बैलजोडी होती. कोरपना तालुक्यातील नांदा येथील नाल्याला आलेल्या पूरात दोघांव्यक्तींसह बैल गाडी वाहून गेल्याचे थरारक दृश्य कॅमेर्‍यात कैद करण्यात आले आहे.
मागील दहा दिवसांपासून हा नाला पुराच्या पाण्याने भरून वाहत आहे. पुलाच्या पलीकडे असलेल्या सात ते आठ गावांना हा नाला पार करून शेतशिवारात जावे लागते. गेली १५ वर्षे या नाल्यावर पूल बांधण्याची ग्रामस्थांची मागणी सरकार दरबारी आहे रखडली आहे. हाच रस्ता पुढे कोरपना-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडला जातो. शेतीच्या अत्यावश्यक कामांसाठी बैल जोडीत असलेल्या दोघांसह पुरातून वाट काढत असताना बैलगाडी वाहून जावे लागली. नदीच्या काठावर असलेल्या ग्रामस्थांनी धावाधाव करत मदत केल्याने बैलजोडी व गाडीतील दोघांचे प्राण वाचले आहेत.