कर्मवीर मा. सा. कमवार सभागृह येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व करीयर मार्गदर्शन

41

आजचे विद्यार्थी महत्त्वाकांक्षी आहेत. ते जिद्द,चिकाटी मेहनत व आत्मविश्‍वासाने अभ्यास करूनआपली शैक्षणिक व सर्वांगीण प्रगती करतात.त्यांच्या प्रगतीसाठी व विकासासाठी पालकांनीजागृत राहून आपली नैतिक जबाबदारीस्वीकारावी, असे आवाहन चंद्रपूर येथील सुप्रसिद्धबालरोगतज्ज्ञ डॉ. अभिलाषा गावतुरे यांनीपालकांना केले.येथील कर्मवीर मा. सा. कमवार सभागृह येथे
पार पडलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळाव करीअर मार्गदर्शन कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानावरून त्या मार्गदर्शन करत होत्या.भूमिपुत्र ब्रिगेड, अखिल भारतीय महात्मा फुलेसमता परिषद व अखिल भारतीय माळी महासंघचंद्रपूरच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे
उद्‌घाटक म्हणून चंद्रपूरचे सुप्रसिद्ध सर्जन वसामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय घाटे, तर प्रमुखअतिथी म्हणून देवराव भांडेकर, मंत्रालय मुंबई
येथील सहायक विक्रीकर उपायुक्‍त किरण गावतुरे,राम महाडोळे, केवलराम कऱ्हाडे, नवभारतविद्यालय तथा ज्युनिअर सायन्स कॉलेजचे प्राचार्यअशोक झाडे, अ. भा. महात्मा फुले समता परिषदचंद्रपूरचे अध्यक्ष प्रा. विजय लोनबले, मूल तालुकापत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक येरमे, सक्सेसपॉईंट चंद्रपूरचे संचालक विजय मुसळे, चंद्रपूरचेसुप्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञ डॉ. सचिन भेदे, भूमिपुत्रब्रिगेडचे अध्यक्ष व ओबीसी नेते डॉ. राकेश गावतुरे,सुप्रसिद्ध विचारवंत डॉ. समीर कदम, ज्ञानज्योतीफाऊंडेशन सावलीचे अध्यक्ष दिनकर मोहूर्ले, डॉ.अमित गुरनुले आदी उपस्थित होते.यावेळी डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी, विद्यार्थ्यांनी मेहनत घेण्याची जिद्द बाळगून मोठे
होण्यासाठी योग्य दिशा ठरवावी व आपापल्याक्षेत्रात पुढे जाऊन व उंच भरारी घेऊन समाज वदेशाच्या कल्याणासाठी कार्य करावे. विद्यार्थ्यांच्या
प्रगतीसाठी पालकांनीही तेवढ्याच जबाबदारीनेवागावे. मुलांचे खच्चीकरण होईल असे वागू नयेतसेच जबाबदारीची जाणीव ठेवून मुलींना पुढे
जाण्याची संधी द्यावी. तंत्रज्ञानाचा योग्य वापरकरून व समर्पित भावनेने कार्य करून विद्यार्थ्यांनीयशस्वी बनावे व समाज व देशकार्या साठी पुढे
यावे, असे आवाहन केले.प्रा. विजय लोनबले यांनी, ग्रामीण भागातीलविद्यार्थ्यांना भविष्य घडविण्यासाठी चालनामिळावी व त्यांचे कौतुक व्हावे यासाठी हा उपक्रमराबविण्यात आल्याचे सांगितले. तसेच समतापरिषदेच्या वतीने जिल्ह्यात केलेले विविध सामाजिक उपक्रम, आंदोलन व सामाजिक दायित्व  याबद्दल माहिती दिली. विजय मुसळे यांनी  विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना समर्पक उत्तरे
देऊन त्यांच्याशी संवाद साधला. डॉ. संजय घाटे, किरण गावतुरे यांनीही याप्रसंगी मार्गदर्शन केले.कार्यक्रमप्रसंगी १० वी व १२ वीतील २०० गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कारकरण्यात आला. यावेळी वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्टकार्य करणारे डॉ. अमित गुरूनुले व नुकतेचएमबीबीएस झालेले डॉ. कुणाल भेंडाळे यांचा शालव सन्मान चिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यातआला.कार्यक्रमाचे संचालन अँड. प्रशांत सोनुलेयांनी, तर आभार नितीन गबाडे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भूमिपुत्र ब्रिगेड,अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद वअखिल भारतीय माळी महासंघाच्या कार्यकर्त्यांनीपरिश्रम घेतले.