जूनासूर्ला गावात पुराचे थैमान शेतकऱ्यांचे मोठे नुकसान (पाहणी करताना तहसीलदारडॉ.होळी)

35

, सरपंच रणजित समर्थ,गणेश खोब्रागडे)

मूल – मुल तालुक्यातील जूनासूर्ला गावातील शेतकऱ्यांची शेती पूर्वेस वैनगंगा नदिकाठला लागून असल्याने शेतकऱ्यांचे धानाचे पेरणी केलेले संपूर्ण पऱ्हरे पुराच्या पाण्याने डूबून असल्याने पेरणी केलेले धान पूर्णतः सडून गेले त्यामुळे रोवणी रोवणी करता येणार नाही. शेतीच्या सभोवताल पानी असल्याने शेतकऱ्यांना जाणेही कठीण झाले आहे . त्यामुळे गावातील शेतकऱ्यांचे अतोनात फार मोठे नुकसान झाले असून याबाबतची माहिती मुल येथील तहसीलदार डॉ.रवींद्र होळी यांना माहिती होताच तात्काळ पाहणी करण्यासाठी गेले आणि शेतकऱ्यांच्या पिकाची झालेल्या नुकसानीची माहिती त्वरित शासनाकडे पाठविण्यात येईल असे ग्रामस्थांना सांगितले. पुराचे प्रत्यक्ष पाहणी करतांना तहसीलदार डॉ. रवींद्र होळी समवेत गावातील ग्राम पंचायत सरपंच रणजित समर्थ, सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष गणेश खोब्रागडे, गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि अनेक गावकरी उपस्थित होते.