कोणतेही अमानुष कृत्य करत असताना कायद्याचे भान असूद्या -न्यायाधीश पंकज अहिर

50

मूल तालुका विधी सेवा समिती तथा तालुका अधिवक्ता संघ मूल यांच्या वतीने नव भारत कनिष्ठ विज्ञान महविद्यालय मूल येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
नेहमी वृत्तपत्रांमधून , टी वी प्रसारमधून याप्रकारचे होत असलेले मानवी अत्याचार, लैंगिक अत्याचार नेहमी ऐकायला मिळतात.यातील क्रूरता, विकृती या कशा प्रकारच्या असतात, ज्यामुळे समाजात असे कृत्य घडतात ,आपण युवा अवस्थे मध्ये काय काय उत्तम समाजोपयोगी शिकलं पाहिजे ,यावर मूल येथील दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश पंकज अहिर यांनी प्रतिबंधात्मक उपाय व कायदेविषयक तरतुदी,याचे विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
आयोजित कार्यक्रमात बेटी बचाव बेटी पढाव या विषयावर एड. सागर मुद्दमवार यांनी मार्गदर्शन केले. तर मोठमोठ्या कॉलेज मध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर होणारे रॅगिंग आणि त्यामधून घडणारे अनुचित प्रकार, काही विद्यार्थ्यांना प्रसंगी जीवही गमवावा लागला.यावर एड.विलास जांगडे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नव भारत कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक झाडे, एड.प्रणव वैरागडे, एड.स्वप्नील भडके, एड.प्रीतम नागपुरे, एड.सरोजिनी पाटील,होते.
कार्यक्रमाचे संचालन प्रा.वंदना उगेमुगे तर उपस्थितांचे आभार प्रा.सुनील कामडी यांनी मानले कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराच्या यशस्वीतेकरिता नरेश मुस्कावार, प्रा.विजय कातकर ,प्रा.चंदन पुस्तोडे,प्रा. येलमुले,एकनाथ गुंडोजवार ,नोविनो बांबोडे, अनिल खोब्रागडे यांनी सहकार्य केले.मोठ्या प्रमाणात वर्ग ११. वी १२ वी चे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या