मूल येथील नवभारत कन्या विद्यालयात कॅप्टन उपकॅप्टनची निवडणूक

29

मूल येथील नवभारत कन्या विद्यालयात कॅप्टन उपकॅप्टनची निवडणूक इव्हिएम मशीनद्वारा घेत, आगळावेगळा उपक्रम साजरा केला.
विद्यार्थाना लोकशाहीची जाणीव व्हावी, मतदान प्रक्रियाची माहिती व्हावी याचे प्रात्याक्षीकही यावेळी करून दाखविण्यात आले.


येथील उपक्रमशील शिक्षक संतोष खाडे यांनी, आपल्या मोबाईल अॅप्स मधील इव्हिएम द्वारे शाळेत कॅप्टन उपकॅप्टनची निवडणूक घेतली. प्रत्यक्ष निवडणूकीत प्रक्रियेत सहभागी होता आल्यांने, विद्यार्थानी आनंद व्यक्त केला. शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला सुंकरवार, पर्यवेक्षक सुधाकर पुराम यांचे मार्गदर्शनात संतोष खाडे यांनी हा उपक्रम राबविला. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.