पडझड झालेल्या घरांचे व पाऱ्ह्याचे नुकसान झाल्याने त्वरित पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी. (तालुका काँग्रेसचे तहसीलदार यांना निवेदन)

43

मुल – मागील पंधरा दिवसापासून सतत मुसळदार पाउसाने थैमान घातले असून मुल नगरातील व तालुक्यातील ग्रामीण भागातील गरीब मजुरांच्या घराची पडझड झालेली गरीबांचे फार मोठे नुकसान झाले आहे. अनेक कुटुंबीयांना इतरत्र तात्पुरत्या स्वरूपात हलविण्यात आले आहे. आजच्या स्थितीत त्यांचे कुटुंब निराधार झाले असून त्यांना शासनाकडून त्वरित नुकसान भरपाई व तात्काळ निवाऱ्याची सोय करावी अशी मागणी मुल तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार मुल यांचेकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे. तसेच मुल व सावली तालुक्यातील अनेक गावे संयुक्त असल्याने दोन्ही तालुक्यातील ग्रामीण शेतकऱ्यांची नुकतीच धानाची पेरणी झालेली होती. परंतु १५ दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतात टाकलेली पऱ्हे पाण्याने भरून असल्याने आणि सभोवताल सगळीकडे पाणीच पाणी वरुन पानी खालूनही पानी वाहत असल्याने जागेवरच टाकलेले धानाचे परहे सडून कुजून गेले आहेत. काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणीसाठी चिखल पऱ्हे टाकण्याचा प्रयत्न केला परंतु बियाणे घ्यायला पैसे नाही. त्यामुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेल्या सारखाच आहे. शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. शेतीशिवाय उत्पंनाचे दुसरे कोणतेही साधन नाही. अशा वेळी मानवाला अन्न आणि जनावरांना चारा कुठून आणावे याविवंचनेत शेतकरी सापडला आहे. अशा प्रसंगी शासनाने शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावे. आणि प्रत्येक शेतकऱ्याला एकरी ५० हजार रुपये आणि घराची पडझड झालेल्या निराधार कुटुंबीयांना प्रत्येकी ५० हजार रुपये नुकसान भरपाई त्वरित द्यावी. अशी मागणी मान. तहसीलदार साहेब यांना मुल तालुका काँग्रेस कमिटी तर्फे करण्यात आली असून लेखी निवेदन देताना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली संतोषवार, ओबीसी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस गुरुदास चौधरी, किसान काँग्रेस सेलचे अध्यक्ष रुमदेव गोहणे, निष्ठावान ज्येष्ठ काँग्रेस पदाधिकारी माजी प्राचार्य बंदुभाऊ गुरनुले, माजी नगसेवक विनोद कामडे, शहर महासचिव कैलाश चलाख, शाताराम कामडे फुलचंद गोगले, अनवर शेख, अल्का कांमडे, शामला बेलसरे, संगीता भोयर माधुरी मंगर, सुरेश फुलझेले, प्रवीण येनुरकर, यांचेसह ग्रामीण व शहर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.