12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव सादर करावे-उपायुक्त विजय वाकुलकर

46
चंद्रपूर,दि. 14 जुलै : शैक्षणिक सत्र 2022-23 मध्ये इयत्ता 12 वी विज्ञान शाखेस प्रवेशित असणा-या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे परिपूर्ण भरलेला अर्ज जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, चंद्रपूर येथे सादर करावा.
अर्ज सादर करतांना ऑनलाईन सादर केलेल्या प्रस्तावाची छायांकित प्रत, ऑनलाईन भरणा केलेली पावती, कॉलेज शिफारस पत्र (इयत्ता 12 वी), फॉर्म नं 15 ए, अर्जदाराचे जात प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (टीसी), अर्जदाराच्या वडीलांचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अर्जदाराचे मोठे वडील/ आत्या यांची टीसी (उपलब्ध असल्यास), अर्जदाराच्या आजोबांची टीसी, आजोबा अशिक्षित असल्यास इतर नावाचा पुरावा जोडणे (महसुली पुरावे इत्यादी), अर्जदाराचे वडीलोपार्जित पुरावे, अधिकारी अभिलेख, सात-बारा, पी-१, घराची कर आकारणी, नमुना – ८, कोतवाल पंजी, विक्रिपत्र इत्यादीपैकी प्रमाणपत्रे सादर करावे.
मूळ शपथपत्रे फॉर्म नं ३ आणि १७ आणि जातीदावा सिध्द करणारे जातीचे व अधिवासाचे मानीव दिनांकापूर्वीचे (अनुसूचित जातीकरिता 10 ऑगस्ट 1950 पुर्वीचे, विमुक्त जाती व भटक्या जमाती करीता 21 नोव्हेंबर 1961 पुर्वीचे व इतर मागासवर्ग आणि विशेष मागासवर्गाच्या उमदेवारांनी 13 ऑक्टोबर 1967 पुर्वीचे) महसुली आणि शैक्षणिक दस्तऐवजांचे छायांकित प्रती कार्यालात सादर करून ऑनलाईन भरणा केलेल्या पावतीची पोहोच घ्यावी. उमेदवारांनी आवश्यक दस्ताऐवज सादर करून जात प्रमाणपत्र पडताळणी तात्काळ करून घ्यावी, असे आवाहन समितीचे उपायुक्त विजय वाकुलकर यांनी केले आहे.