दुचाकी अपघातात 3 जण जखमी

30

मुल – गडचिरोली हायवे मार्गाने आकापुरकडे जाणाऱ्या दुचाकी वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बैल घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाल्याची घटना घडली. आशिष गेडाम वय (२२) वर्षे, गोलू वरखडे वय (२२) वर्षे दोघेही रा. आकापुर येथील रहिवासी असून काही कामानिमित्त मुल ला आले होते. मुल वरून आकापर कडे परत जात असताना मल पासून २ किमी अंतरावर रस्त्याने शेतात बैल घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याला धडक दिल्याने दुचाकी चालक त्या सोबत असलेला युवक आणि शेतकरी गंभीर जखमी झाला असून त्यांना मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास मुल पोलीस करीत आहे.