चिखलीचे मारोती मेश्राम व कचरु मेश्राम यांचे घर पडल्याने दोन्ही कुटुंब उघड्यावर

30

 

मुल – सतत आठ दिवसापासून सुरु असलेल्या पाऊसा मुळे मुल तालुक्यातील चिखली येथील मजुरी करुन संपूर्ण कुटुंबाच्या उदनिर्वाहासाठी झटणारे श्री. मारूती देवाजी मेश्राम यांचे राहते घर नियमित सुरु असलेल्या रिमझिम पाऊसाच्या झलीने पडल्याने संपूर्ण कुटुंब घरविना निराधार झाल्याची घटना काल रात्रीच्या वेळेला घडली असून मारुती मेश्राम यांना कुणाचा आसरा घ्यावा या विवंचनेत असताना चिखली ग्राम पंचायतीचे कर्तव्यदक्ष होतकरू उपसरपंच प्रा. दुर्वास कळसकर यांना माहीत होताच तात्काळ मेश्राम यांना भेटून पडलेल्या घराची पाहणी करून कुठेतरी आसरा दिला पाहिजे या भावनेतून मुल पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री.देव घुनावत व तहसीलदार डाक्टर होळी यांना प्रत्यक्ष मोबाईलवर बोलून घराची पडझड झाल्याची माहिती दिली. असता चिखली येथे पशुवैद्यकीय अधिकारी यांचा कार्टर खाली असल्याने तिथेच मारुती मेश्राम व कचरु मेश्राम यांच्या कुटुंबांना आसरा दिल्याने बेघर वीणा निराधार झालेल्यांना तात्पुरता आधार मिळाला आहे. याकामी गट विकास अधिकारी श्री. देव घुनावत, तहसीलदार श्री.होळी उपसरपंच दुर्वास कळसकर,तलाठी गायकवाड,ग्रामसेवक चीमुरकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष बबन कडसकर, राजेश जोलमवार,यांचेही सहकार्य लाभले. तसेच उपसरपंच प्रा.दुर्वास कळसकर यांनी तहसीलदार साहेबांना दोन्ही कुटुंबीयांना शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत व अन्नधान्य किट्स देण्याची विनंती सुद्धा केली आहे .