गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून योग गुरू अनिल गांगरेडीवार यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार

74

महर्षि पंतजली योग भवन येथे गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून सकाळी हवन व योगसाधक ,योग गुरू अनिल गांगरेडीवार यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
3000 इ. स पूर्वी आषाढ पोर्णिमेला हस्तिनापूर म्हणजे आताचे दिल्ली येथे यमूना तटावर महर्षि वेद व्यास यांचा जन्म झाला.

त्यांनी महाभारत या महाकाव्यासह,वेद ,पुराणे लिहिलीत, त्यांचा जन्मदिवस हा गुरूपौर्णिमा म्हणून देशभरात साजरी केली जाते, गुरू चा अर्थ आहे गु म्हणजे अंधार व रू म्हणजे प्रकाश,,अंधारातून प्रकाशाकडे नेतो, तो म्हणजे गुरू म्हणून गुरूचे आपल्या जीवनातील स्थान महत्वपूर्ण आहे . हे स्थान अबाधित राहावे व ही परंपरा पुढे चालत राहावी यासाठी योगभवन येथे हवन करून व शुभेच्छा देत गुरूपोर्णिमेचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

कार्यक्रमास प्रभाकर भोयर, अनिल गांगरेडीवार, गणेश मांडवकर, दिलीप पोकळे, अरविंद गिरी, राजू मार्तीवार, वंदना मुत्यालवार,,
रेखा पोकळे, रजनी रामगिरवार, सूलोचना तांगडे, वंदना वाकडे, अनुजा रेड्डीवार यांसह अनेक योगसाधक, योगसाधिका उपस्थित होते.