अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी

52

मूल:-  मागील आठवडाभरापासून परिसरामध्ये संततधार पाऊस सुरू आहे. गेल्या पाच दिवसापासून सूर्यदर्शनही झाले नाही,सततच्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. संततधार पावसामुळे पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.

शेतकऱ्यावर कोसळलेल्या नैसर्गिक संकटामुळे मोठे आर्थिक नुकसान होऊन आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अतिवृष्टीनेग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे प्रशासनाने करून नुकसानीचा अहवाल तातडीने राज्य सरकारकडे पाठवून परिसरातील शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा 

   मागील चार ते पाच दिवसापासून मुलसह जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसाने पेरणी केलेले धान्य उगवलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.

त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. मागील महिन्यात तालुक्यात सर्वच शेतकऱ्यांनी धानाची पेरणी केलेली होती.

मात्र, जून महिन्यात पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळण्याची भीती जाणवत होती.

जुलै महिन्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला होता.

मागील आठवडयापासून संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे या आधी केलेली पेरणी केलेले धान्य उगवले नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आहे.

शेतकरी अगोदरच आर्थिक संकटात असताना सततच्या पावसाचा शेतकऱ्याला चांगलाच फटका बसलेला असून शेतकरी पूर्णतः हवालदिल झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे.