Ø आरक्षण सोडत सादर करण्यासाठी कार्यक्रम जाहीर
मुल तालुक्यातील सर्व नागरिकांना सुचित करण्यात येते किए जिल्हा परिष्द व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक.2022 च्या अनुशंगाने मुल गटातील निर्वाचक गणांचे आरक्षण काढण्यासाठी दिनांक 13/07/22 रोजी तहसिल कार्यालय मुल येथील सभागृहात सकाळी 11.00 वाजता सभेचे आयोजन केलेले आहे.
तरी सर्व नागरिक व इच्छूक उमेदवारांना सदर आरक्षण सोडत सभेस उपस्थित राहण्याचे याव्दारे असे आवाहन आवाहन तहसिलदार डाॅ.रविंन्द्र होळी करण्यात येत आहे
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका-2022
Ø आरक्षण सोडत व प्रारूपावर हरकती व सूचना सादर करण्यासाठी कार्यक्रम जाहीर
जिल्हा परिषद चंद्रपूर व जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीकरीता आरक्षण सोडत व आरक्षण प्रारुपावर हरकती व सुचना सादर करण्यासाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम,1961 मधील कलम 12 उपकलम (1), कलम 58(1)(अ) प्रमाणे व महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम) नियम, 1996 नुसार अनुक्रमे जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (स्त्रियांच्या आरक्षणासह) राखून ठेवावयाच्या जागा आणि उर्वरित स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत. त्यानुसार आरक्षण निश्चित करण्याकरिता सोडत काढणे तसेच आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना सादर करण्यासाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
पंचायत समिती मुलकरीता आरक्षण निश्चित करण्यासाठी सभा दि. 13 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजता
तहसील कार्यालयात पार पडेल. वरील ठिकाणी विहित वेळेत हजर राहावे, आवाहन तहसिलदार डाॅ.रविंन्द्र होळी यांनी कळविले आहे.