सेन्ट एन्स पब्लिक स्कूल मुल चा विद्यार्थी आराध्य श्रीकांत कारडे याची नवोदय विद्यालय प्रवेशा करिता निवड

32

सेन्ट एन्स पब्लिक स्कूल मुल चा विद्यार्थी आराध्य श्रीकांत कारडे याची नवोदय विद्यालय प्रवेशा करिता निवड झालेली आहे. नवोदय विद्यालय याकरिता जिल्ह्यातील शहरी भागातील एकूण सात विद्यार्थ्यांची निवड झालेली असून त्यापैकी आराध्य हा पाचव्या क्रमांकाचा विद्यार्थी व मुल तालुक्यातील शहरी भागातील एकमेव विद्यार्थी आहे.

कोणतीही खाजगी शिकवणी न लावता वडीलांच्या मार्गदर्शनाखाली तयारी पूर्ण करून आराध्यने हे यश मिळवले आहे. या यशाचे श्रेय त्याने आपले शालेय मुख्याध्यापक,शिक्षक व आई-वडिलांना दिले आहे.

आराध्या चे वडील कृषी विभागात कृषी पर्यवेक्षक पदावर असून आराध्यच्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.