जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, राजगड,येथील कु.श्रुती मयुर लाडे नवोदय विद्यालयासाठी निवड

43

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, राजगड,येथील कु.श्रुती मयुर लाडे  हिची इयत्ता 6 वी साठी नवोदय विदयालय येथे निवड झालेलेी आहे. नुकत्याच नवोदय विद्यालयाच्या २०२२ चा निकाल घोषित झाला. यामध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, राजगड ,तालुका मुल येथील कु.श्रुती मयुर लाडे हिची नवोदय विद्यालयासाठी निवड झालेली आहे .

कु.श्रुती, राजगड चे प्रगतशील शेतकरी मयुर घनश्याम लाडे यांची मुलगी असून कु,.श्रुती यशाचे श्रेय तीने तीचे आईवडील, तीचे मार्गदर्शक हितेश्वर सोनुले सर , मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, राजगड व त्यांचे सहकारी शिक्षक वाघमारे मॅडम व तराने सर यांना दिलेले आहे .कु. श्रुती चे अभिनंदन मा. चंदू पाटील मारकवार, उपसरपंच ग्राम पंचायत राजगड, ऍड. बि. टी. लाडे. मा. राजु पाटील मारकवार सर्व शिक्षक वृंद त्याचबरोबर सर्व आप्त स्वकीयांनी केलेले आहे.पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.