उद्या शिकाऊ उमेदवारांचा मेळावा

36

चंद्रपूर :शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडचिरोली येथे ११ जुलै रोजी पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. सदर मेळावा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर रोड, गडचिरोली येथे सकाळी १0 ते दुपारी ४ वाजेपयर्ंतच्या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे.

या मेळाव्यामध्ये औरंगाबाद, पुणे, नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली येथील नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. या मेळाव्यामध्ये उद्योजकांकडून उमेदवारांच्या प्राथमिक मुलाखती घेण्यात येणार आहे. मेळाव्याच्या अधिक माहितीकरिता गडचिरोली येथील 0७१३२-२२२३६८ या क्रमांकावर संपर्क साधावा.