शेतकरी उत्पादक गटांना गोदाम बांधकाम करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

29

चंद्रपूर :-
राष्ट्रीय खाद्यतेल अभियान सन २0२२-२३ अंतर्गत गळीत धान्य उत्पादनाच्या सुरक्षित साठवणुकीसाठी व मूल्य वृद्धीसाठी गोदाम सुविधा आवश्यक आहे. ज्या ठिकाणी गळीतधान्य पिके व कडधान्य पिके घेतली जातात तथापि गोदामाची व्यवस्था नाही, अशा ठिकाणी गोदामाचे बांधकाम करावे.

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य कार्यक्रमानुसार जिल्ह्यास दोन्ही योजनेंतर्गत प्रत्येकी १ गोदाम बांधकाम घटकाचे लक्षांक प्राप्त आहे.
२५0 मे.टन क्षमतेचे गोदाम बांधकाम करण्यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५0 टक्के किंवा जास्तीत जास्त रुपये १२.५0 लक्ष यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनु™ोय राहील.

वरीलप्रमाणे दोन्ही योजनेकरिता सदर बाब बँक कजाश्री निगडित असून केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना, नाबार्डच्या मार्गदर्शक सूचना लागू राहतील. सदर घटकासाठी शेतकरी उत्पादक संघ, कंपनी एफपीओ/एफपीसी अर्ज करू शकतील.

तरी, इच्छुक शेतकरी उत्पादक संघ, एफपीओ/एफपीसी यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात दि. २0 जुलै २0२२ पयर्ंत अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बर्‍हाटे यांनी केले आहे.