पीक विमा भरण्याची सोय आपले सेवा केंद्रात उपलब्ध

97

खरीप हंगाम सन २०२२ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकन्यांनी १५ ते ३१ जुलै दरम्यान विमा हप्ता भरुन सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृषी अधिकारी यांनी केले आहे. राज्यातील खरीप आणि रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. त्यानुसार राज्य शासनाने कप अॅन्ड कॅप मॉडेल नुसार बीड पॅटर्न लागू केला आहे.

योजनेंतर्गत अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरून राबविण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. योजनेंतर्गत आपत्ती, कीड आणि रोगासारख्या संकटामुळे शेतीच्या होणाऱ्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येणार आहे. ८०-११० सूत्रानुसार बीड पॅटर्न पीक विमा योजना राज्यभर राबविण्यात येणार आहे. विमा कंपन्यांना नुकसान भरपाई पोटी ११० टक्के पेक्षा अधिक रक्कमद्यावी लागली तर त्याचा भार राज्य व केंद्र शासन उचलणार असून या उलट कंपनीला ८० टक्के पेक्षा कमी रक्कम द्यावी लागल्यास शेतकऱ्यांना दिलेली मदत अधिक २० टक्के नफा ठेऊन कंपनीला उर्वरित रक्कम राज्य सरकारला द्यावी लागणार आहे.

पीक विमा काढताना शेतकऱ्यांना रब्बीसाठी १.५ टक्के, खरीप हंगामासाठी २ टक्के तर खरीप आणि रब्बी हंगामातील कापूस व कांदा पिकासाठी ५ टक्के भार उचलावा लागणार आहे. विमा हप्त्याची उर्वरित रक्कम राज्य आणि केंद्र सरकार समान प्रमाणात भरणारआहे. जिल्ह्यात आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी कडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सदर पीक विमा योजना ही अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकांसाठी असणार आहे. तसेच कर्जदार व बिगर कर्जदार शेतकन्यांसाठी ऐच्छिक आहे.

योजनेंतर्गत खरीप हंगाम २०२२ या हंगामाकरिता जोखीमस्तर सर्व अधिसूचित पिकांसाठी ७० टक्के निश्चित करण्यात आला आहे.

यामध्ये ई-पीक पाहणी अंतर्गत पिकाची नोंद घेण्यात यावी. विमा योजनेत विमाअसा राहणार आहे पाकानहाय

विमा हप्ता – ज्वारी पिकासाठी विमा संरक्षित रक्कम २७ हजार रुपये तर विमा हप्ता ५४० रुपये – भुईमूग पिकासाठी विमा संरक्षण ३८ हजार रुपये विमा हप्ता ७६० रुपये .

सोयाबीन विमा संरक्षण ४९ हजार रुपये विमा हप्ता ९८० रुपये –

मूग व उडीद विमा संरक्षण २० हजार रुपये विमा हप्ता ४०० रुपये –

तूर विमा संरक्षण ३५ हजार रुपये विमा हप्ता ७०० रुपये .

कापूस पिकासाठी विमा संरक्षण ५२ हजार रुपये विमा हप्ता २ हजार ६०० रुपये शेतकयाला भरावा लागणार आहे.

सर्व पिकांसाठी जोखीम स्तर ७० टक्के असून विमा हप्ता ज्वारी, भूईमूग, सोयाबीन, मूग, उडिद, तूर पिकासाठी २ टक्के तर कापूस पिकासाठी ५ टक्के विमा हप्ता असणार आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांनी तत्काळ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, उपविभागीय कृषी अधिकारी, संबंधित तालुका कृषी अधिकारी तसेच जवळच्या बँकेशी किंवा ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कळविले आहे.

असा राहणार आहे पीकनिहाय विमा हप्ता

  • ज्वारी पिकासाठी विमा संरक्षित रक्कम २७ हजार रुपये तर विमा हप्ता ५४० रुपये
  • भुईमूग पिकासाठी विमा संरक्षण ३८ हजार रुपये विमा हप्ता ७६० रुपये
  • सोयाबीन विमा संरक्षण ४९ हजार रुपये विमा हप्ता ९८० रुपये
  • मूग व उडीद विमा संरक्षण २० हजार रुपये विमा हप्ता ४०० रुपये
  • तूर विमा संरक्षण ३५ हजार रुपये विमा हप्ता ७०० रुपये

कापूस पिकासाठी विमा संरक्षण ५२ हजार रुपये विमा हप्ता २ हजार ६०० रुपये शेतकऱ्याला भरावा लागणार आहे. सर्व पिकांसाठी जोखीम स्तर ७० टक्के असून विमा हप्ता ज्वारी, भूईमूग, सोयाबीन, मूग, उडिद, तूर पिकासाठी २ टक्के तर कापूस पिकासाठी ५ टक्के विमा हप्ता असणार आहे.