लोकमतचे तालुका प्रतिनिधी राजू गेडाम सर यांचा वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा

31

प्रशासकीय अधिकारी तथा पत्रकारांची उपस्थितीती

मूल येथील लोकमतचे तालुका प्रतिनिधी तथा जनकल्याण शिक्षण संस्था मूल चे संस्थापक अध्यक्ष राजू गेडाम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तहसिल कार्यालयाजवळील ओपन स्पेस मध्ये वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मूलचे तहसिलदार डॉ. रविंद्र होळी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात

पंचायत समिती मूलचे गट विकास अधिकारी देव घुनावत, नायब तहसिलदार यशवंत पवार, ओंकार ठाकरे, उपजिल्हा रुग्णालय मूलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्वल इंदुरकर, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जिवन प्रधान, कृषि अधिकारी सुनिल कारडवार, दे धक्काचे संपादक भोजराज गोवर्धन, कार्यकारी संपादक मंगेश पोटवार, संजिविनी पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष तथा सर्प मिञ उमेश झिरे, पब्लीक पंचनामाचे संपादक विजय सिद्धवार, मूल न्यूज चे संपादक अमित राऊत,

पि एम news पोर्टर चे संपादक प्रमोद मशाखेत्री,नवराष्ट्र वार्ताहर प्रकाश चलाख,नगर परिषद मूल चे आरोग्य निरीक्षक अभय चेपुरवार, पाणी पुरवठा व स्वच्छता अभियंता श्रीकांत समर्थ, आलेख बारापात्रे, सामाजिक कार्यकर्ते शैलेश वनकर, जनकल्याण संस्थेचे सदस्य अमोल वाळके, बंडू अल्लीवर, रवि वाळके, शशिकांत गणवीर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी वृक्ष लावणे व त्याचे संगोपन करणे काळाची गरज बनली असुन प्रत्येकानी आपल्या वाढदिवसानिमित्त वृक्षाचे रोपण करून संगोपनाची जबाबदारी घेतली तर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त केला