चिखली येथील शेतकऱ्यावर रानटी डुकराच्या चाव्याने शेतकरी जखमी

43

मूल – मुल तालुक्यातील  येथील शेतकरी चिखली पासून पूर्वेस असलेल्या कन्हाळगाव. देवस्थान मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत शेतकरी श्री. डेमाजी रामजी चुदरी वय (५५) यांची शेती असल्याने शेतात काम करुन घराकडे परत येत असताना दुपारी ३-३० वाजता रस्त्याच्या कडेला असलेल्या पण शेतकऱ्याला न दिसलेल्या रानटी डूकराणे अचानकपणे शेतकरी डेमाजी चुदरी यांचेवर हल्ला करून त्याच्या पोटावर वार करून गंभीर जखमी केले.

याबाबतची माहिती चिखली येथील त्याच्या कुटुंबीयांना कळताच जखमी शेतकऱ्याला चिखली ग्रामस्थ व ग्राम पंचायत उपसरपंच प्रा. दुर्वास कळसकर, ग्राम पंचायत सदस्य पंकज कडस्कर व त्याचे कुटुंबीय स्वतः तात्काळ मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात आणून प्राथमिक उपचार करून लगेच त्याला चंद्रपूरला उपचारासाठी हलविण्यात आले.

सदरची घटना सावली उपवन परिक्षेत्रात येत असल्याने तेथील वनरक्षक धनविजय यांनी सावली येथील वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. वसंत कामडी यांना तात्काळ कळविली असून घटनेचा पंचनामा करण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी घटनास्थळाकडे धाव घेतली. पुढील तपास वनविभाग करीत आहे.