प्रथम वर्ष पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ

40

 दहावीनंतर कोणत्या अभ्यासक्रमाची निवड करावी असा प्रश्न विद्यार्थी व पालकांना नेहमीच पडलेला असतो. पदविका अभियांत्रिकी (पॉलिटेक्निक) हा रोजगार मिळवून देणारा एक अभ्यासक्रमाचा उत्तम असा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी नुकत्याच प्रकाशित केलेल्या वेळापत्रकानुसार शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी (पॉलिटेक्निक) साठीच्या प्रवेशअर्ज नोंदणी प्रक्रियेस मुदतवाढ करण्यात आली असून आता ७ जुलैपर्यंतप्रवेश घेता येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील एकमेव शासकीय तंत्रनिकेतन ब्रह्मपुरी व अन्य खाजगी तंत्रनिकेतन येथे प्रत्यक्ष भेटून व ऑनलाइन पद्धतीनेसुद्धा नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सदर मुदतवाढीचा लाभ घेऊन उत्कृष्ट अभियंता होण्याच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतन ब्रह्मपुरीचे प्राचार्य तथा चंद्रपूर जिल्ह्याचे नोडल अधिकारी डॉ. डी. एन. शिंगाडे यांनी केले आहे. प्रवेश प्रक्रिया समन्वयक म्हणून प्रथम वर्षासाठी डॉ. अभिजीत दाभाडे काम पाहत आहेत.