विद्यार्थ्यांनींनी साजरा केला कृषी संजीवनी सप्ताह, प्रात्यक्षिक, प्रशिक्षण व वृक्षारोपण

31

स्थानिक कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी सिंदेवाही तालुक्यातील सरडपार येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम व कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत विविध उपक्रमाने साजरा केला.

खरीप हंगाम २०२२ यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतुने साजरा केलेल्या सप्ताहात विविध पिकांचे तंत्रज्ञानाचा प्रसार, पौष्टिक तृणधान्य दिन, महिला कृषी तंत्रदान सक्षमीकरण, खत बचत दिन, प्रगतशील शेतकरी संवाद, शेती पूरक व्यवसाय आणि कृषी दिन आदी उपक्रम राबविण्यात आले.

सप्ताहातंर्गत सरडपार ग्रामपंचायतच्या सरपंचा उज्ज्वला सिडाम, उपसरपंच किशोर कोठेवार, कृषी अधिकारी ए.एस. चिव्हाने, कृषी पर्यवेक्षक एम. एस. ढवळे, कृषी सहाय्यक टी.एस.गाडगे, आर.एन.कणखर, चिडे, प्रगतशील शेतकरी भाऊराव कोठेवार, कृषी मित्र अरविंद कोठेवार, आयसीआय फाऊंडेशनचे राकेश पाखमोडे आदींनी उपस्थित राहुन सहकार्य केले. कृषी संजीवनी सप्ताह कालावधीत विविध प्रात्यक्षिक, प्रशिक्षण व वृक्षारोपण इ. कार्यक्रमाचे ग्रामस्तरावर आयोजन करण्यात आले होते.

तसेच जिल्ह्यातील कृषी विभागाचे अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन केले. या अनुषंगाने श्रेया नखाते, आचल रहांगडाले , वैष्णवी कोठारे, चेतना खरबडे , मोहिनी भानारकर, बमलेश्वरी पोठले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.   

     सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी कृषी महाविद्यालय मूल (सोमनाथ) चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विष्णूकांत टेकाळे, कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही चे प्रमुख डॉ. एन. कापसे व कार्यक्रम अधिकारी डॉ. शैलेश सरनाईक यांचे विद्यार्थीनींना मोलाचे मार्गदर्शन लाभले.