लोकवर्गणी आणि युवकांच्या पुढाकाराने एक अप्रतिम अस वाचनालय

38
मुल तालुक्यातील ग्रामपंचायत चिचाळा येथे  लोकवर्गणी आणि युवकांच्या पुढाकाराने एक अप्रतिम अस वाचनालय सुरू करण्यात आलेले आहे… टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवून आणि गावातली व इतर सामाजिक व शैक्षणिक कार्यकर्त्या कडून 10 रुपया पासून वर्गणी गोळा करून, गावातली युवकांनी परिश्रम घेऊन सुंदर असं वाचनालय तयार केले आहे… या त्यांच्या कार्याचा दखल विविध क्षेत्रातून घेतली जात आहे….
या कार्यक्रमाचे उद्घाटन देव घुनावत साहेब (गटविकास अधिकारी मुल), सह उद्घाटन डॉ. सचिन भेदे (मनोविकार तज्ञ चंद्रपूर),  कार्यकमाचे अध्यक्ष जस्मिता ताई लेनगुरे सरपंच ग्रामंचायत चिचाळा, प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले सुनील करडवार साहेब (सहाय्यक गटविकास अधिकारी मुल),  प्रधान साहेब (विस्तार अधिकारी प. स. मुल), सौ. शशिकला ताई गावतुरे ( कार्यकारी अखिल भारतीय माळी महासंघ चंद्रपूर),  नामदेवराव गावतूरे,   समीर कदम सर (सामाजिक कार्यकर्ता पुसद), विशेष अतिथी म्हणून लाभलेले  पंढरीनाथ गेडाम साहेब (ग्रामविकास अधिकारी चिचाळा),  हिरालाल भडके सर ( सामाजिक कार्यकर्ता मुल),  सुरजभाऊ चलाख उपसरपंच ग्रामपंचायत चिचाळा व ग्रामपंचायात कमिटी सर्व मान्यवर व समस्त गावकरी व युवा वर्ग कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
                 देव घुनावत  यांनी स्पर्धा परीक्षा बद्दल मार्गदर्शन केेले.. व समोर वाटचालीस शुभेच्छा दिल्या… तसेच सर्व मान्यवरांनी देखील शुभेच्छा चा वर्षाव केला. व समोर आपल्या गावातून मोठा अधिकारी घडणार आणि गावाचा नाव मोठं होईल अशी आशा देखील व्यक्त केली.