ऑनलाईन संगणकाची कासवगती; कागदपत्रासाठी नागरिकांची डोकेदुखी ,सर्वर अन्डर मेनटनन्स

32

सध्या संगणकीय युग आहे. या युगात कामांना जलद गतीने चालना मिळते. परंतु, मुल परिसरात ही जलद गतीची ऑनलाईन सेवा कासवगतीने मिळत असल्यामुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. शाळेचे निकाल लागल्यामुळे पुढील प्रवेशासाठी लागणारी विविध कागदपत्रं ही शासनाने नेमून दिलेल्या विविध केंद्रांतून तयार केली जातात.

 

उत्पन्नाचे प्रमाणपत्र, डोमेसाईल तसेच जातीच्या प्रतिज्ञापत्र प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे ही या ऑनलाईन सेवा केंद्रांतून मिळतात. परंतु, गेल्या काही दिवसांपासून ही सेवा कासवगतीने मिळत असल्याने बरीच कामे रखडली आहेत. त्यामुळे स्थानिक सध्या तसेच बाहेरगावाहून येणारे नागरिक ऑनलाईन केंद्रांचे उंबरठे झिजवताना दिसून येत आहेत. बँक कर्जासाठी शेतकऱ्यांना शंभर रुपयांच्या मुद्रांकावर प्रतिज्ञापत्र द्यावे लागते. शेतीची कामे सोडून शेतकरी पीक कर्जाच्या कागदपत्रांमागे आहे.परंतु, तिथेही त्याला कासवगतीच्या ऑनलाईन सेवेचा फटका बसत आहे. त्यामुळे वरिष्ठ स्तरावरून यामध्ये लक्ष घालून नागरिकांची ही ज्वलंत समस्या त्वरित निकाली काढणे गरजेचे आहे. अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतात त्यांना वेळीच कागदपत्रे उपलब्ध करून द्यावी लागतात. मात्र ती कागदपत्र मिळण्यास विलंब होतो.

गेल्या काही दिवसांपासून साईट स्लो झाल्यामुळे ऑनलाईन सेवा केंद्रांतून माझ्याकडे कागदपत्रे येण्यास विलंब होत आहे. त्यामुळेच वेळ लागत आहे. नागरिकांच्या समस्या जलद गतीने मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. – पृथ्वीराज साधनकर ,नायब तहसीलदार ,मुल

 

29/06/2022 Server Under Maintenance सर्वर अन्डर मेनटनन्स  प्रति व्ही एल ई,

सर्व व्हीएलईना सूचित करण्यात येत आहे की काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यामुळे सेवा देण्यासाठी असलेले सर्व्हर धीम्या गतीने काम करत असून अर्ज स्विकारताना वेळ लागत आहे. सदर तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी तांत्रिक टीम काम करत असून आज संध्याकाळ पर्यंत सर्व्हर पूर्ववत होण्याची अपेक्षा आहे.

आपणास होणाऱ्या गैरसोयीबद्दल क्षमस्व.