स्मार्ट कार्डला 31आॅगस्ट मुदतवाढ

32

 एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड योजनेला ता. ३१ आॅगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचे पत्र नुकतेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांचे वाहतूक महाव्यवस्थापक यांनी सर्व विभागांना दिले आहे. त्यामुळे एसटीच्या स्मार्ट कार्डचा स्मार्ट कार्ड धारकांना याचा लाभ मिळणार आहे. मुदत वाढीमुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

एसटी महामंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाड्यात ३३ टक्के ते १०० टक्के पर्यंत सवलत देण्यात येते. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी निगडित असलेल्या स्मार्ट कार्ड काढण्याची योजना एसटी महामंडळाने यापूर्वीच सुरू केलेली आहे. त्यानुसार एसटी महामंडळाने यापूर्वीच सुरू केलेले आहे. त्यानुसार एसटीच्या प्रत्येक आगारांमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि आणि सवलत धारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 

सध्या कोरोनाचा धोका कमी झाला असला तरी दरम्यानच्या काळात शासनाने गर्दी कमी करण्याबाबत विविध उपाययोजना अंमलात आणल्या. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक प्रवाशांना आगारात येऊन स्मार्ट कार्ड घेणे शक्‍य नसल्याने तसेच या संबंधीची माहिती आगारात येऊन प्रत्यक्ष देता येत नसल्याने या योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदत वाढ आता ३१ आॅगस्ट २०२2 पर्यंत देण्यात आली आहे. स्मार्ट कार्डला देण्यात आलेली मुदत वाढ ही अंतिम असून, यानंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही. त्यामुळे याबाबतची कल्पना ज्येष्ठ नागरिकांना देण्यात यावी असे वाहतूक महाव्यवस्थापकांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.