नकला, अभिनय, गायन, वादक आदी कलेत आवड असणाऱ्या नवोदित कलाकारांची निवड चाचणी

57

मूल/ प्रतिनिधी
समाजात असणाऱ्या विविध समस्यांवर कलेच्या माध्यमातून जनतेला प्रबोधन करण्यासाठी कलापथक एक प्रभावी माध्यम व परिणामकारक ठरत आहे. त्यामुळे जनमानसात निर्माण होणाऱ्या विविध समस्या कलापथकाच्या माध्यमातुन सुटाव्यात यासाठी जनकल्याण शिक्षण संस्था मूलने पुढाकार घेतला आहे.चंद्रपूर जिह्यात कलेची आवड असणाऱ्या नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी निवड चाचणी प्रक्रिया राबवून कला समुह निर्माण करण्याचा मानस व्यक्त करण्यात येत आहे.

निवड झालेल्या कलाकारांना कलपथकात सहभागी करुन योग्य मानधन देण्याचा प्रयत्न संस्थेचा असणार आहे. यासाठी नकला, अभिनय, गायन, वादक आदी कलेत आवड असणाऱ्या युवक युवतींनी रविवार दिनांक ३ जुलै २०२२ ला सकाळी ११ वाजता जनकल्याण शिक्षण संस्था मूल तहसिल कार्यालयाच्या मागे मूल येथे होणाऱ्या निवड चाचणी प्रक्रियेसाठी उपस्थित राहावे.

नवोदित कलाकारांना यात निवड केल्यानंतर कलापथकाच्या कार्यक्रमात सहभागी करुन योग्य मानधन देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी जनकल्याण कला मंच मूल चे कार्यवाहक अमोल वाळके (8766718588), बंडू अल्लीवार (9284311727), रवी वाळके,(9579358787) यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.