अंधर्शद्धेचा नाईनाट करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा -श्रीकांत रेशीमवाले

41

अंधर्शद्धा निर्मूलन ही काळाची गरज असून, एकविसाव्या शतकामध्ये अंधर्शध्देचा समुळ नाईनाट होऊन समाजात विज्ञाननिष्ठता जोपासली पाहिजे यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लब चंद्रपूरचे अध्यक्ष श्रीकांत रेशीमवाले यांनी व्यक्त केले. जयकिसान बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारा संचालित कृषक विद्यालय सुशी दाबगाव येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र बुरांडे, अंधर्शध्दा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रदीप आडकिने, सामाजिक कार्यकर्ते रमेश मेहरे, रोटरी क्लबचे अविनाश उत्तरवार, कीर्ती चांदे, मोकलकर, संस्थेचे सदस्य शामराव भुरसे, परशुराम शेटे आदि उपस्थित होते. 

       मान्यवरांच्या हस्ते मानव विकास मिशन अंतर्गत रोटरी क्लबच्या सहकार्याने विद्यालयातील वर्ग ८ ते १0 मधील ५0 विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यांत आले. शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत आता ग्रामीण भागातील विद्यार्थीही कमी पडताना दिसत नाही. त्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांनी ग्रामीणतेची भावना मनात न आणता जोमाने अभ्यास करावा, यश नक्कीच पदरात पडल्याशिवाय राहणार नाही.

        असे मनोगत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्रीकांत रेशीमवाले यांनी कोरोना काळात विद्यार्थ्यामध्ये अनियमितता आली होती. परंतु त्यांच्यातील अनियमिता कमी करावी, ग्रामीण मुलींमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून सायकलीचा उपयोग करावा, असे आवाहन केले.

         कार्यक्रमाचे औचित्य साधून संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र बुरांडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक नंदकिशोर भरडकर यांनी केले. शिक्षक अरूण चिचघरे यांनी संचलन व आभार मानले.