“नियमित योगा हाच समाधानी व निरोगी जीवनाचा मूलमंत्र आहे “- योगगुरू डॉ. रवि कटलावार.

29

हाय-टेक कॉलेज ऑफ फार्मसी येथे, आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, निरोगत्वम् हेल्थ केअर सेंटर, चंद्रपूर व रा. से. यो. युनिट हाय टेक कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने “योगा फॉर हुम्यानिटी” या संकल्पने नुसार योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन चे विदर्भ सचिव, निरोगत्वम् हेल्थ केअर सेंटर
चे संचालक तथा जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, चंद्रपूर
चे योगशिक्षक
नॅचरोपॅथ श्री रवि कटलावार व
डॉ मनिषा कटलावार यांनी मार्गदर्शन केले. “मानवता टिकून राहण्यासाठी समाधानी व निरोगी समाज निर्माण करणे गरजेचे आहे व त्यासाठी योग हा एकमात्र जीवनाचा मूलमंत्र आहे” असे प्रतिपादन डॉ रवि कटलावार यांनी या प्रसंगी केले. यावेळी विविध आसन व प्राणायाम करुन त्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन सांगण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ सतिश कोसलगे यांनी योगा फॉर हुमानिटी या संकल्पनेचा विस्तार केला. यावेळी उपप्राचार्य डॉ पंकज पिंपलशेंडे, डॉ वसीम शेख, रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. उमेश तेलरांधे आदी उपस्थित होते. संचालन
प्रा. वैशाली चौधरी तर आभार
प्रा. उमेश तेलरांधे यांनी मानले.