सिदेवाही तालुका ग्राहक पंचायत ची नवीन कार्यकारिणी गठित

24

जागो ग्राहक जागो । ग्राहक हित सर्वोपरी।।

सिदेवाही तालुका ग्राहक पंचायत ची नवीन कार्यकारिणी गठित

सिंदेवाही:-

दि.२४ जुन २०२२ रोज शुक्रवारला दुपारी २ वाजता वनकर्मचारी सहकारी पतसंस्था सिंदेवाही-लोनवाही येथेअ.भा. ग्राहक पंचायतच्या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर सभेकरीता अ.भा.ग्राहक पंचायतचे चंद्रपूर जिल्हा संघटक श्री दीपक देशपांडे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून तर सोमेश्वर पाकवार हे अध्यक्षस्थानी होते.

श्री दीपक देशपांडे यांनी सदर सभेत ग्राहक संरक्षण कायदा,ग्राहक पंचायतची उद्दिष्टे,ग्राहक पंचायतची आवश्यकता या विषयावर उपस्थितांसमोर सखोल मार्गदर्शन केले. साधकबाधक चर्चेनंतर ग्राहक संघटनेची आवश्यकता लक्षात घेऊन आजच्या बैठकीत,ग्राहक पंचायत संघटनेची सिंदेवाही तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली.

यामध्ये अध्यक्ष- श्री सोमेश्वर पाकवार
उपाध्यक्ष – श्री परशुराम वसाके
सचिव- श्री जमिल रफिक शेख
संघटक- श्री अनिल कंठीवार
सहसचिव- श्री मांडवकर सर
तर सदस्य म्हणून नकटुजी सोनुले, अशोक जी साळवे, मनोहर पर्वते, हेमंतकुमार किंदर्ले , राकेश बोरकुंडवार, प्रशांत गेडाम,आनंदराव गजपुरे व स्वप्नील कावळे यांची सर्वानुमते नेमणूक करण्यात आली.
बैठकीच्या शेवटी श्री नकटुजी सोनुले यांनी आभार मानले.