प्रचलित दरानुसार गँस जोडणी करून मिळावी -माजी आमदार देवराव भांडेकर यांची मागणी

55

शालेय पोषण आहार योजने अंतर्गत राज्यातील शाळांना सरकारी गॅस कंपन्याद्वारे सध्याच्या गॅस जोडणीच्या दरानुसार एल.पी.जी.गॅस जोडणी उपलब्ध करून दयावी. अशी मागणी माजी आमदार देवराव भांडेकर यांनी राज्याच्या शालेय शिक्षण मंञ्याकडे केली आहे.
पाठविलेल्या निवेदनात माजी आमदार देवराव भांडेकर यांनी शाळेतील माध्यान्ह भोजनासाठी एलपीजी गॅस जोडणी बाबत शिक्षण संचालक यांनी आदेश दिले आहे. दिलेल्या सदर आदेशात शिक्षण संचालक यांनी गॅस जोडणीचे दर हे घरगुती वापराच्या गॅस जोडणीचे दर्शविले असून सध्याच्या प्रचलित दरापेक्षा अत्यंत कमी दर्शविले आहे.

शाळेतील मूलांची संख्या जवळपास ५० ते ५०० पर्यंत असते. त्यामूळे शाळांना घरगुतरी गॅस जोडणी देणे धोक्याचे असून संख्येने अधिक असलेल्या विद्यार्थ्यांचे शालेय पोषण आहार घरगुती गॅस शेगडी, घरगुती रेग्युलेटर व पाईप द्वारे करणे धोक्याचे आहे. जास्तीचे स्वयंपाक करावयाचे झाल्यास हायप्रेशर रेग्युलेटर, मोठी भट्टी शेगडी व हाय प्रेशरची पाईप जोडणी आवश्यक आहे. यदाकदाचित घरगुती वापराची गॅस जोडणी वापरून शालेय पोषण आहार शिजवल्यास धोका होण्याची दाट शक्यता आहे.

त्यामूळे शालेय पोषण आहारा करीता व्यावसायीक गॅस जोडणी वापरा बाबत निर्देश दिल्या जावे. अशी विनंती करतांना भांडेकर यांनी शालेय पोषण आहार शिजवतांना गॅस सिलेंडर संपल्यास तातडीची व्यवस्था असणे आवश्यक असल्याने प्रत्येक शाळांना किमान दोन गॅस सिलेंडर खरेदी व रिफीलींग करण्याचे निर्देश देवून सदर खर्च कोणत्या फंडातून करावा.

यासंबंधी स्पष्ट निर्देश दिल्या जावे. असे निवेदनात नमुद आहे. निवेदनाची प्रत शिक्षण राज्यमंत्री यांचेसह शिक्षण संचालक यांनाही पाठविण्यांत आले आहे.