मुल शहरातील रेल्वे स्टेशन लगत तयार होत असलेल्या रेलवे माल धक्का वाहतुकचे स्थलांतरण करण्यात यावे

66

मूल रेल्वे स्टेशनवर नविन मालधक्याचे काम सुरू असून, हा मालधक्का मूल शहरातील एकमेव मैदानालगत असल्यांने, हा मालधक्का कार्यान्वीत झाल्यास, नागरीकांना प्रदुषणाचा त्रास होणार आहे. यामुळे हा मालधक्का इतरत्र हलवावा अशी मागणी मूल येथील मार्निग ग्रुपने मूलचे तहसिलदार यांचेकडे निवेदनातून केली आहे.

चंद्रपूर, मूल, गडचिरोली, नागपूर महामार्गावरून छत्तीसगह, मध्यप्रदेश, तेलंगाना, आंध्रप्रदेशात मोठ्या प्रमाणावर वाहने ये-जा करतात. गोंदिया–बल्हारपूर हा रेल्वेमार्ग या राष्ट्रीय महामार्गावरूनच जात आहे. रेल्वे लाईनला लागूनच कर्मवीर महाविद्यालय, बल्हारपूर पब्लिक स्कूल, पंचायत राज प्रशिक्षण केंद्र आहे. या महामार्गाला लागूनच मूल शहरातील एकमेव कर्मवीर महाविद्यालयाचे मैदान आहे. रेल्वे मालधक्का झाल्यास, येथे कच्चा लोहा, कार्बन मॅगनीज, फॉस्परस, गंधक, सिलीकॉन यासारखे घातक पदार्थ सर्वत्र पसरणार असून, नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण होणार आहे. अनेक वर्षाच्या मागणीनंतर, मूल शहराचे सौंदर्यीकरण झाले. शहराचे सिमेवरच रेल्वेफाटक असून, रेल्वेमुळे वारंवार फाटक पडत असते. यामुळे वाहनाच्या रांगाच– रांगा लागत आहे. मालधक्का झाल्यास, ही समस्या आणखीनच गंभीर होण्यांची भिती आहे. शासनाने नागरीकांच्या आरोग्यांची अडचण लक्षात घेता हा मालधक्का इरतत्र हलवावा अशी मागणी हिरेन शहा, जीवन कोंतमवार, दिनेश गोयल,राजू झोडे, नितीन येरोजवार, प्रशांत समर्थ, चंदू मारगोनवार, सुरेश फुलझेले, ऍड. अश्विन पोलीकर गुडमॉर्निंग ग्रुप चे सर्व सदस्य आदीनी केली आहे.