मूलच्या रेल्वे फटकावर त्वरित उड्डाण पुलाची निर्मिती करावी-वाहतूक धारकांनी, विद्यार्थ्यांनी, व्यापारी , शेतकरी बांधवांनी

29

मुल – चंद्रपूर- गडचिरोली नागपूर हा मार्ग पूर्वेस सरळ छत्तीसगड, मध्यप्रदेशकडे जात असून चंद्रपूर बल्लारपूर मार्ग दक्षिणेस तेलंगणा, आंध्रप्रदेश, चेन्नई, तामिळनाडू कडे जाणारा असल्याने हा मार्ग हायवे असल्याने या मार्गावरून रोजच हजारो चे संखेनी ट्रक, चारचाकी वाहन, दुचाकी वाहन हायवा, चोवीस चाकांचे वाहन नियमित धावत असतात. त्यामुळे इतर वाहतूक धारकांना अडचण निर्माण होत असते.

तसेच याच रेल्वे फाटकाला लागूनच कर्मवीर कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, लहान मुलांचे कांव्हेंट लागून असल्याने शिक्षण घेणारे विद्यार्थी, विद्यार्थिनीना कॉलेज मधे जण्यायेण्यासाठी कुठलाही दुसरा मार्ग नसल्याने हेच रेल्वे फाटक रोजच ओलांडून जाणे भाग पडत आहे. हजारो विद्यार्थांची सायकल व पायी जाणे अडचणीचे होत आहे. प्रसंगी बोर्ड व विद्यापीठ परीक्षेचे पेपर जर सुरू असेल तर मात्र कुठूनच जाता येत नसल्याने पेपरला देखील वेळेवर उपस्थित राहता येत नाही. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होत आहे. दिनांक १७ जून २०२२ रोजी सकाळी ११ वाजता रेल्वे जात असताना रेल्वे फटकपासून चंद्रपूर रोडकडे डोंगरी पर्यंत तर मुल नगराकडे येणाऱ्या रस्त्याकडे दुय्यम निबंधक कार्यालय पर्यंत २ तासापर्यंत संपूर्ण वाहतूक थांबलेली होती.

तसेच मुल नगर हे तालुक्याची मुख्य बाजारपेठ असल्याने आणि, पोलीस स्टेशन, उपजिल्हा रुग्णालय, कृषी उत्पन्न बाजार समिती, तांदळाची मुख्यबाजारपेठ, बुधवारला आठवडी बाजार आहे. तसेच मुल नगराचा मध्यभागातून या मार्गाची वाहतूक होत असल्याने नगरातील नागरिकांना देखील फार मोठे अडचणीचे होत आहे.

प्रसंगी याच मार्गावर मोठ्या वाहनांची गर्दी नेहमीच होत असल्याने चारचाकी व दुचाकी वाहनाचे अपघातही वाढत जात आहे. यासाठी कर्मवीर महाविद्यालयां जवळ असलेल्या रेल्वे फटकावर उड्डाण पूल होणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

करिता मूलच्या रेल्वे फटकावर त्वरित उड्डाण पुलाची निर्मिती करावी. अशी मागणी असंख्य वाहतूक धारकांनी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी, लहान मोठ्या व्यापारी बंधूंनी, शेतकरी बांधवांनी यांचेसह मूलच्या नागरिकांनी केली आहे.