लग्नानंतर आधार कार्डवरील नाव कसं बदलावं?

72

आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी किंवा पुराव्यांपैकी एक आहे. जे ओळखीचा पुरावा आणि पत्ता पुरावा म्हणून वापरले जाते. आधार कार्डाशिवाय तुमची अनेक कामे थांबू शकतात. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डमध्ये काहीही अपडेट करायचे असेल तर ते वेळेत करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आता मुलांना जन्मानंतर लगेच आधार कार्ड मिळण्याची सुविधाही दिली जाणार आहे. दुसरीकडे, मुली लग्नानंतर त्यांचे आडनाव बदलतात, त्यामुळे तुमचे आधार देखील वेळेत अपडेट होणे अत्यंत आवश्यक आहे.

आधार कार्ड ही एक अशी प्रणाली आहे. ज्यामध्ये लोकांना 12 अंकी क्रमांक दिला जातो जो त्यांच्या बायोमेट्रिक्सशी जोडलेला असतो. कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड आवश्यक आहे.

लग्नानंतर आधार कार्ड कसं अपडेट कराल? 

लग्नानंतर तुम्ही तुमचे आधार कार्ड ऑनलाइन अपडेट करू शकता. खरे तर लग्नानंतर मुली आपल्या पतीचे नाव स्वतःच्या नावाशी जोडतात. आजकाल बहुतेक लोक असे करतात. परंतु जर तुम्ही ते अधिकृतपणे बदलण्याचा विचार करत असाल तर सर्व कागदपत्रांमध्ये देखील ते अपडेट करणे महत्वाचे आहे.

कागदपत्र ;- विवाह प्रमाणपत्र, किंवा राजपत्र, नाहीतर सरपंच  सही,शिक्का

आधार कार्डवरील नाव-पत्ता बदलणे सोपे

अनेकदा आधार कार्डवरील नावात काही तरी चूक किंवा आपण दिलेल्या पत्त्यात चूक झालेली असते. त्यामुळे आता खासगी काम असो की सरकारी. आधार कार्ड आवश्यक बनले आहे. जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरील झालेली चूक किंवा पत्त्यात झालेली चूक दुरूस्त करायची असेल तर फार चिंता करण्याची गरज नाही.
हे बदल करू शकता
आधार कार्डमध्ये केवळ नाव नव्हे तर जन्मतारीख, घराचा पत्ता, मोबाइल नंबर सुद्धा बदलता येवू शकतो. आधार कार्डमधील आपले नाव बदलण्यासाठी तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही. फक्त तुमच्या आधार कार्डमध्ये रजिस्टर नंबर असायला हवा.
नावाला अपडेट करण्यासाठी तुमच्याकडे एक आयडी प्रूफ असणे गरजेचे आहे.

आयडी पुरावा म्हणून पॅन कार्ड, ड्रायविंग लायसन्स, मतदान कार्ड, रेशन कार्ड अपलोड करू शकता.